नवी दिल्ली, 22 एप्रिल : सलग 3 दिवस फ्यूचर मार्केटमध्ये सोन्याच्या किंमतीमध्ये घसरण झाल्यानंतर बुधवारी सोन्याचे भाव काहीसे वधारलेले पाहायला मिळाले. एमसीएक्स एक्सचेंजवर जूनच्या फ्यूचर किंमतीमध्ये 1 टक्क्यांची वाढ होत सोन्याचे भाव प्रति तोळा 45 हजार 768 रुपयांवर पोहोचले आहेत. गेल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय बाजारात झालेल्या उलाढालीमुळे सोन्याच्या किंमतींनी 47 हजारांचा रेकॉर्ड गाठला होता. मात्र त्यानंतर सोन्याचे भाव उतरले. चांदीच्या किंमतीतही फ्यूचर मार्केटमध्ये घसरण झाल्याचे पाहायला मिळाली. 0.35 टक्क्यांनी चांदी घसरून प्रति किलो 41 हजार 602 रुपयापर्यंत पोहोचली आहे. (हे वाचा- Jio मध्ये Facebook सर्वात मोठा भागीदार, वाचा या करारातील 8 महत्त्वाच्या गोष्टी ) लाइव्ह मिंट ने दिलेल्या बातमीनुसार बुधवारी आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्डची किंमत स्थिर आहेआ. ही किंमत 1,685 डॉलर प्रति औंस इतकी आहे. याआधी कच्च्या तेलाचे (Crude Oil) भाव घसरल्यामुळे गुंतवणूकदारांनी हे नुकसान भरून काढण्याकडे मोर्चा वळवला. परिणामी स्पॉट गोल्डच्या किंमतीत 2 टक्क्यांची घसरण झाली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात प्लॅटिनमच्या किंमती 0.4 टक्क्यांनी वाढून 749.76 डॉलर प्रति औंसवर पोहोचल्या आहेत. तर चांदीमध्ये 0.3 टक्क्यांची वाढ होत किंमत 14.88 डॉलर प्रति औंसवर पोहोचली आहे. (हे वाचा- लॉकडाऊनमध्ये Google, Amazonमध्ये कामाची संधी, 2 लाख नोकऱ्या देणार या कंपन्या ) मंगळवारी देखील आतंरराष्ट्रीय बाजारात डॉलरचे मुल्य वधारल्यामुळे आणि अमेरिकन कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये झालेल्या घसरणीचा परिणाम भारतातील सोन्याच्या फ्यूचर मार्केटवर झाला होता. फ्यूचर मार्केटमध्ये जूनच्या सोन्याच्या किंमतीमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळाली होती. अमेरिकन कच्च्या तेलाची किंमत घसरून 0 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचल्याने त्याचा परिणाम सोन्याच्या किंमतीवर झाल्याचे पाहायला मिळाले. संपादन - जान्हवी भाटकर