नवी दिल्ली, 24 मार्च: सोन्याच्या किंमतीमध्ये (Gold Price Today) 8000 रुपये प्रति 100 ग्रॅमची घसरण झाली आहे. अर्थात भारतात बुधवारी सोन्याचे दर 800 रुपये प्रति तोळाने कमी झाले आहेत. या घसरणीनंतर 22 कॅरेट सोन्याचे दर (22-Carat Gold) 43,000 रुपये प्रति तोळा आहेत. बुधवारी 24 कॅरेट सोन्याचे दर 44,000 रुपये प्रति तोळा आहेत. गुडरिटर्न वेबसाइटच्या मते सोन्याच्या किंमतीत 19 मार्चपासून सलग घसरण होत आहे. 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रत्येक राज्य आणि शहरानुसार वेगवेगळी असते. जाणून घ्या भारतातील महत्त्वाच्या शहरातील 22 कॅरेट सोन्याची किंमत -मुंबई: 43,000 रुपये प्रति तोळा -पुणे: 43,000 रुपये प्रति तोळा -दिल्ली: 44,050 रुपये प्रति तोळा -चेन्नई: 42,280 रुपये प्रति तोळा -कोलकाता: 44,400 रुपये प्रति तोळा -बंगळुरू: 41,900रुपये प्रति तोळा - हैदराबाद: 41,900 रुपये प्रति तोळा (हे वाचा- नोकरदारांसाठी मोठी बातमी! PF मध्ये 5 लाखांपर्यंतची गुंतवणूक झाली TAX FREE ) 24 कॅरेट सोन्याची किंमतही प्रत्येक राज्य आणि शहरानुसार बदलते. जाणून घ्या भारतातील महत्त्वाच्या शहरातील 24 कॅरेट सोन्याची किंमत -मुंबई: 44,000 रुपये प्रति तोळा -पुणे: 44,000 रुपये प्रति तोळा -दिल्ली: 48,050 रुपये प्रति तोळा -चेन्नई: 46,120 रुपये प्रति तोळा -कोलकाता: 47,000 रुपये प्रति तोळा -बंगळुरू: 45,700 रुपये प्रति तोळा - हैदराबाद: 45,700 रुपये प्रति तोळा काय आहेत वायदे बाजारातील सोन्याचे दर? मल्टि कमोडिटी एक्सचेंजवर (MCX Multi Commodity Exchange) सोन्याचे भाव आज वधारलेले पाहायला मिळाले. याठिकाणी 0.4 टक्क्यांनी सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. या वाढीनंतर सोन्याचे दर 44,835 रुपये प्रति तोळा या स्तरावर ट्रेड करत होते. तर चांदीमध्ये देखील आज वायदे बाजारात उसळी पाहायला मिळाली. 0.34 टक्क्याने चांदीच्या दरात वाढ होऊन दर 65,190 रुपये प्रति किलो झाले आहेत.