नवी दिल्ली, 28 ऑक्टोबर : भारतीय सराफा बाजारात सणासुदीच्या काळात मागील दोन दिवस घसरणीची नोंद झाली होती. त्यानंतर आज 28 ऑक्टोबर 2021 रोजी सोन्याचा भाव (Gold Price Today) वधारला आहे. त्यामुळे 10 ग्रॅम सोन्याचा दर 47000 रुपयांवर पोहोचला आहे. त्याउलट चांदीच्या किंमतीत (Silver Price Today) घसरण झाली असून एक किलोचा भाव 64000 रुपयांच्या खाली आहे. मागील सत्रात दिल्ली सराफा बाजारात सोने दर 46,938 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. तर चांदीचा भाव 63,970 रुपये प्रति किलोवर बंद झाला होता. सोन्याचा आजचा भाव - दिल्ली सराफा बाजारात सोने दरात 112 रुपये प्रति 10 ग्रॅमची वाढ झाली आहे. त्यामुळे राष्ट्रीय राजधानी दिल्लीत 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याचा भाव 47 हजार रुपयांवर 47,050 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. फेस्टिव्ह सीजनमध्ये सोनं आपल्या रेकॉर्ड स्तरावरुन 9150 रुपये प्रति 10 ग्रॅम स्वस्त आहे. ऑगस्ट 2020 मध्ये सोने दर 56,200 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या सर्वोच्च स्तरावर पोहोचला होता.
चांदीचा नवा भाव - चांदीच्या दरात आज घसरण पाहायला मिळाली. दिल्ली सराफा बाजारात चांदीच्या दरात 203 रुपयांची घसरण झाली आहे. आज चांदीचा भाव 63,767 रुपये प्रति किलो इतका आहे.
गोल्ड दरात वाढ का? एचडीएफसी सिक्योरिटीजचे (HDFC Security) सीनियर एनालिस्ट तपन पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, कॉमेक्सवर गोल्ड दरात वाढीची नोंद झाली. आंतरराष्ट्रीय बाजारात मिळालेल्या संकेतांमुळे सोने दर वधारला. त्याशिवाय अमेरिकी बॉल्ड यील्डमध्ये घसरणीमुळेही सोने दरात वाढ झाली आहे.