नवी दिल्ली, 10 जून: आंतरराष्ट्रीय बाजारातील कमजोरीमुळे भारतीय बाजारात देखील गुरुवारी 10 जून रोजी सोन्याच्या दरात (Gold Price Today) पुन्हा एकदा घसरण पाहायला मिळाली. तर चांदीचे दर देखील (Silver Price Today) आज उतरले आहेत. आधीच्या सत्रात सोन्याचे दर 48,386 रुपये प्रति तोळावर पोहोचले होते. तर चांदीचे दर प्रति तिलो 70,384 रुपयांवर बंद झाले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर कमी झाल्याने त्याचा परिणाम देशांतर्गत बाजारातील सोन्याच्या किंमतीवर झाला आहे. सोन्याचे आजचे दर (Gold Price, 10 June 2021) दिल्लीतील सराफा बाजारात गुरुवारी सोन्याचे दर 259 रुपयांनी कमी झाले आहेत. या घसरणीनंतर 99.9 शुद्धतेच्या सोन्याचे दर 48,127 रुपये प्रति तोळा झाले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर आज कमी झाल्यानंतर 1,880 डॉलर प्रति औंसवर पोहोचले आहेत. दिल्लीतील सराफा बाजारात गेल्यावर्षी 7 ऑगस्ट रोजी (7 August 2020) सोन्याचे दर 57,008 रुपये प्रति तोळावर पोहोचले होते. याआधारे आज सोनं 8,881 रुपये स्वस्त दराने विकलं जात आहे. हे वाचा- Gold: सोन्यामध्ये गुंतवणूक ठरेल फायद्याची, हे 4 पर्याय मिळवून देतील नफा चांदीचे आजचे दर (Silver Price, 10 June 2021) चांदीची झळाळी देखील गुरुवारी उतरली आहे. दिल्लीतील सराफा बाजारात आज चांदीच्या दरात 110 रुपयांची किरकोळ घसरण झाली आहे. या घसरणीनंतर चांदीचे दर प्रति किलो 70,274 रुपयांवर पोहोचले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात आज चांदीच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. याठिकाणी चांदीचे दर 27.65 डॉलर प्रति औंस आहेत. का घसरले सोन्याचे दर? एचडीएफसी सिक्योरिटीजचे (HDFC Securities) सीनियर अनालिस्ट (कमोडिटीज) तपन पटेल यांच्या मते न्यूयॉर्कमधील कमोडिटी एक्सचेंज कॉमेक्सवर (COMEX) 24 कॅरेट सोन्याच्या स्पॉट गोल्ड किंमतीत घसरण पाहायला मिळाली. शिवाय अमेरिकन डॉलरमध्ये मजबुती पाहायला मिळाल्याने देखील सोन्याचे भाव घसरले आहेत. मोतीलाल ओसवाल फायनॅन्शियल सर्व्हिसेसचे उपाध्यक्ष (कमोडिटी रिसर्च) नवनीत दमानी यांच्या मते आधीच्या सत्रात सोन्याच्या दरात मोठ्या प्रमाणात चढउतार सुरू होता. हे वाचा- तुमच्याकडे सोन्याचे दागिने असतील तर अशी मिळवा अधिक रक्कम, लक्षात ठेवा या गोष्टी देशातील मुख्य शहरातील सोन्याचे दर गुड रिटर्न्स वेबसाइटच्या मते आज देशात 24 कॅरेट सोन्याची किंमत 5,230 रुपये प्रति ग्रॅम, 41,840 रुपये प्रति 8 ग्रॅम, 52,300 रुपये प्रति तोळा आणि 5,23,000 रुपये प्रति 100 ग्रॅम आहे. तर 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति तोळा 47,950 रुपये आहे. » दिल्ली- 22 कॅरेट सोन्याची किंमत 47,950 रुपये प्रति तोळा आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 52,300 रुपये प्रति तोळा आहे » मुंबई- 22 कॅरेट सोन्याची किंमत 47,880 रुपये प्रति तोळा आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 48,880 रुपये प्रति तोळा आहे » कोलकाता- 22 कॅरेट सोन्याची किंमत 48,200 प्रति तोळा आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 50,900 रुपये प्रति तोळा आहे » चेन्नई- 22 कॅरेट सोन्याची किंमत 46,150 प्रति तोळा आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 50,350 रुपये प्रति तोळा आहे