JOIN US
मराठी बातम्या / मनी / दिवाळीपर्यंत सोन्याचे दर गाठणार 52000 रुपयांचा स्तर, लवकर करा खरेदी; आता 9000 रुपयांनी स्वस्त मिळत आहे सोनं

दिवाळीपर्यंत सोन्याचे दर गाठणार 52000 रुपयांचा स्तर, लवकर करा खरेदी; आता 9000 रुपयांनी स्वस्त मिळत आहे सोनं

Gold Investment: तुम्ही जर सोनेखरेदीचा विचार करत असाल तर अजिबात उशिर करू नका. कारण सध्या रेकॉर्ड स्तरापेक्षा 9000 रुपये स्वस्त दरानं सोनं मिळत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 06 जुलै: तुम्ही जर सोनेखरेदीचा विचार करत असाल  (Gold Investment) तर त्याकरता अजिबात विलंब करू नका. आज जरी सोन्याच्या दरात वाढ झाली असलती तरी गेल्या काही दिवसांपासून मात्र सोन्याच्या दरात (Gold Price Today) कमजोरी पाहायला मिळाली. यानंतर सोन्याचे दर 47000-48000 रुपये प्रति तोळाच्या दरम्यान व्यवहार करत आहेत. त्यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत सोन्याचे दर 9000 रुपयांनी कमी आहेत. मात्र येणाऱ्या काही आठवड्यात सोन्याचे दर वाढण्याची शक्यता आहे. सराफा बाजारातील तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की सोन्यामध्ये पुन्हा एकदा तेजी येणार आहे. त्यामुळे सोनेखरेदीची आताच संधी आहे. जाणकारांच्या मते तुम्ही आता गुंतवणूक केली तर दिवाळीपर्यंत मजबूत रिटर्न मिळवता येईल. काय म्हणतात तज्ज्ञ? आयआयएफएल सिक्योरिटीजचे व्हाइस प्रेसिडेंट (कमोडिटी अँड करन्सी) अनुज गुप्ता यांच्या मते, जाणकार असं म्हणत आहेत की सोन्याच्या किंमती कमी होण्यास आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत दोन्ही बाजार जबाबदार आहेत. साधारणत: जुलै महिन्यात सोनेबाजारात सुस्ती पाहायला मिळते, कारण या दरम्यान भारतात लग्नसराईचा हंगाम नसतो. यामुळे सोन्याची मागणी घटते. बाजार तज्ज्ञांच्या मते यावेळी सोन्यामध्ये गुंतवणूक सर्वात फायदेशीर ठरेल. हे वाचा- Gold Price: सोन्याचांदीच्या किंमतीत तेजी, दर 2 आठवड्यांच्या सर्वोच्च स्तरावर 52,000 रुपये प्रति तोळा पोहोचतील सोन्याचे दर जगभरात कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. भारतासह जगभरातील अनेक देशात या व्हेरिएंटमुळे तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जर येणाऱ्या काळात डेल्टा प्लसमुळे कोरोनाचे संक्रमण अधिक वाढले तर पुन्हा एकदा याचा परिणाम शेअर बाजारावर होऊ शकतो. यामुळे बाजारात मोठी घसरण पाहायला मिळेल. असं झाल्यास गुंतवणूकदार पुन्हा एकदा सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे वळतील. याच कारणामुळे सोन्याचे दर 52,000 रुपये प्रति तोळावर पोहोचण्याची शक्यता आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या