JOIN US
मराठी बातम्या / मनी / मला गोल्ड लोन घ्यायचं असेल तर ते कसं मिळेल, काय करायचं?

मला गोल्ड लोन घ्यायचं असेल तर ते कसं मिळेल, काय करायचं?

तुम्ही बँकेकडे सोनं ठेवून त्यावर लोन घेऊ शकता आणि तुमच्या गरजा पूर्ण करू शकता.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई: आजकाल लोन पटकन मिळणं कठीण झालं आहे. त्यासाठी लागणारी कागदपत्र आणि भरावी लागणारी प्रोसेस फी ही खूप जास्त असल्याने त्या कटकटीत कोण पडणार असं आपल्याला होतं. घरात सोनं आहे तर तुम्ही ते तारण ठेवून त्यावर कर्ज घेऊ शकता. जर तुम्हाला सोन्यावर कर्ज घ्यायचं असेल तर नक्की कोणत्या गोष्टी कराव्या लागतील जर तुमच्या घरी सोनं असेल तर तुम्ही गोल्ड लोनसाठी अर्ज करू शकता. हे बँकेचे साधारण व्याजदराची टक्केवारी आहे. यामध्ये बदल होऊ शकतात. वर्ष आणि किती लोन घेता यावरही अनेक गोष्टी अवलंबून असतात. तुम्ही बँकेकडे सोनं ठेवून त्यावर लोन घेऊ शकता आणि तुमच्या गरजा पूर्ण करू शकता. कोणती बँक किती देते लोन? फेडरल बँक- 8.50 टक्के SBI गोल्ड लोन- 7.30 टक्के पंजाब आणि शिंदे बँक - 7 टक्के बँक ऑफ महाराष्ट्र - 8.70 टक्के पंजाब नॅशनल बँक- 7.70 ते 8.75 टक्के कॅनरा बँक - 7.35 टक्के इंडियन बँक - 7 टक्के बँक ऑफ बडोदा- 9 टक्के बँक ऑफ इंडिया- 8.40 टक्के कर्नाटका बँक- 8.49 टक्के आयडिबीआय बँक- 7 टक्के एचडीएफसी बँक - 11 टक्के

कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त Home Loan, तुमची बँक आहे का?

होम लोन घेताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिथे गेल्यावर तुमचं सोनं खरं आहे की नाही ते तपासलं जातं. त्यानंतर त्याचं वजन पाहिलं जातं. त्यावर तुम्हाला किती लोन मिळणार हे निश्चित होतं. तुम्हाला बँकेकडे काही महत्त्वाची कागदपत्र भरावी लागतात. सगळ्या फॉरमॅलिटी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला लोन दिलं जातं. तुम्हाला लोन घेताना आधार कार्ड पॅन कार्डची कॉपी बँकेत जमा करावी लागते. तुम्ही जर लोन फेडलं नाही तर तुमचं सोनं ऑक्शनमध्ये काढलं जातं. त्यामुळे त्याचे नियमही समजून घेणं आवश्यक आहे. गोल्ड लोन घेण्याआधी अटी आणि शर्थी समजून घ्या नाहीतर नुकसान होऊ शकतं.

बँक ऑफ महाराष्ट्रने दिलाय महत्त्वाचा अलर्ट, आताच चेक करा नाहीतर होईल नुकसान

प्रत्येक बँक किंवा संस्थेचे नियम वेगळे असतात. त्यामुळे सगळे नियम समजून घेतल्यानंतरच पुढची प्रक्रिया पूर्ण करा. गोल्ड लोनसाठी ऑनलाइन अर्ज करता येतो. मात्र बाकी प्रक्रिया बँकेत जाऊन करता येते. प्रत्येक बँकेच्या साईटवर गोल्ड लोनचे नियम आणि अटी देण्यात आल्या आहेत.

संबंधित बातम्या

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या