नवी दिल्ली, 12 जून: शुक्रवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (Multi Commodity Exchange MCX) सोन्याचे दर (Gold Price) 318 रुपये प्रति तोळाने घसरल्याने सोन्याचे दर 48,880 रुपयांवर बंद झाले होते. कमोडिटी एक्सपर्टनुसार सोन्याच्या किंमतीत झालेली ही घसरण बुलियन गुंतवणुकदारांसाठी एक चांगली बातमी आहे. बाजार जाणकारांचं असं म्हणणं आहे की सोन्याचे दर कन्सोलिडेशनच्या स्थितीतून जात आहे आणि पुढे जाऊन हे दर 48,500 रुपये प्रति तोळाच्या स्तरावर देखील पोहचू शकतात. बुलियन एक्सपर्ट्सच्या (Bullion Expert) मते अशाप्रकारे घसरणीच्या वेळी सोन्यामध्ये गुंतवणूक करणे फायद्याचे असते. सोन्याचे दर डिसेंबर महिन्यापर्यंत 53,500 रुपये प्रति तोळाच्या स्तरावर पोहचू शकतात. मोतीलाल ओसवालचे Amit Sajeja यांच्या मते सोन्याचे दर कन्सोलिडेशनच्या स्थितीतून जात आहे आणि ही परिस्थिती एका महिन्यापर्यत अशीच राहू शकते. या दरम्यान सोन्याचे दर 48,300 ते 49,500 रुपये प्रति तोळापर्यंत पोहोचू शकतात. सोने गुंतवणुकदारांना असा सल्ला असेल की त्यांनी गुंतवणुकीची संधी समजून प्रत्येक घसरणीदरम्यान खरेदी करावी. मीडियम टर्ममध्ये सोन्याचा आउटलुक देखील चांगला आहे आणि येणाऱ्या काळात मीडियम टर्ममध्ये सोन्याचे दर 51,000 रुपये प्रति तोळावर पोहचू शकतात. त्यांनी असे म्हटले आहे की यूएस डॉलरमध्ये आलेली कमजोरी हे सोन्याच्या घसरणीचे मुख्य कारण आहे. हे वाचा- या बँकेच्या ग्राहकांना पैसे जमा करण्यासाठी लागणार शुल्क, चेकबुकबाबतही नियमात बदल दिवाळीपर्यंत सोन्याचे दर गाठतील सर्वोच्च पातळी IIFL Securities चे अनुज गुप्ता यांचे देखील असे म्हणणे आहे की, मीडियम आणि लाँग टर्म दृष्टीने सोन्याचा आउटलुक पॉझिटिव्ह आहे. गुंतवणुकदारांनी घसरणीच्या काळात खरेदीसाठी रणनीती आखणे आवश्यक आहे. गुप्ता यांच्या मते देशांतर्गत बाजारात सोन्याचे दर प्रति तोळा 53,500 रुपयांचा स्तर गाठू शकतात. त्यांनी असे म्हटले आहे की 15 जुलै नंतर सोन्याचे दर वाढतील. दिवाळी ते वर्षअखेरपर्यंत सोन्याचा दर सर्वोच्च पातळीवर राहण्याची शक्यता आहे.