JOIN US
मराठी बातम्या / मनी / गोल्ड बाॅण्डची विक्री येत्या सोमवारपासून होणार सुरू, 'ही' आहे प्रति ग्रॅम किंमत

गोल्ड बाॅण्डची विक्री येत्या सोमवारपासून होणार सुरू, 'ही' आहे प्रति ग्रॅम किंमत

Gold Bond, Modi Government - तुम्हाला सरकारी गोल्ड बाॅण्ड खरेदी करायचे असतील तर जाणून घ्या त्याबद्दल

जाहिरात

Closeup of big gold nugget, finance concept

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 07 सप्टेंबर : तुम्हाला गोल्ड बाॅण्ड खरेदी करायचेत? सरकारी गोल्ड बाॅण्डची नवी सीरिज सोमवार 9 सप्टेंबरपासून सुरू होतेय 9 ते 13 सप्टेंबरपर्यंत हे गोल्ड बाॅण्ड तुम्ही खरेदी करू शकता. याची किंमत 3,890 रुपये प्रति ग्रॅम आहे. जे गुंतवणूकदार ऑनलाइन अर्ज करतील, डिजिटल पेमेंट करतील त्यांना इश्यू प्राइझ 50 रुपये प्रति ग्रॅम सूट देण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. आरबीआयनं सांगितलं, ‘अशा गुंतवणूकदारांसाठी गोल्ड बाॅण्डचं इश्यू प्राइज 3,840 रुपये प्रति ग्रॅम आहे.’ साॅवरेन गोल्ड बाॅण्डची सुरुवात नोव्हेंबर 2015मध्ये झाली होती. सोन्याचे दागिने खरेदी करणं कमी व्हावं आणि सोन्याच्या खरेदीचा उपयोग बचतीसाठी व्हावा म्हणून हा बाॅण्ड सुरू झाला. सोनं खरेदी करून घरात ठेवण्यापेक्षा बाॅण्ड घेतला तर करही वाचतो. बँकेचं कर्ज फेडू न शकणाऱ्यांकडेही असतात ‘हे’ 5 कायदेशीर अधिकार नोव्हेंबर 2015मध्ये सरकारी सोन्याची मागणी कमी करण्यासाठी आणि घरगुती बचतीचा एक मार्ग म्हणून गोल्ड बाॅण्डची सुरुवात झाली होती. बाॅण्डमध्ये कमीत कमी गुंतवणूक 1 ग्रॅम आहे. जास्तीत जास्त गुंतवणूक एका व्यक्तीमागे 500 ग्रॅम करता येते. 1. ही स्कीम काय आहे? - साॅवरेन गोल्ड बाॅण्डची सुरुवात नोव्हेंबर 2015मध्ये झाली. यात तुम्ही सोनं खरेदी करून ठेवण्यापेक्षा साॅवरेन बाॅण्डमध्ये गुंतवणूक केली, तर तुमचा करही वाचतो. 2. कशी खरेदी करायची गोल्ड बाॅण्ड स्कीम? - या बाॅण्डची विक्री बँका, स्टाॅक होल्डिंग काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, ठराविक पोस्ट ऑफिस आणि एनएसई म्हणजे बीएसईद्वारे होईल. खूशखबर! लागोपाठ तिसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किमतीत घट, ‘हे’ आहेत आजचे दर मिळतात हे 4 फायदे 1. ऑनलाइन पेमेंटवर जादा सवलत - अर्थमंत्रालयानं सांगितलं की भारत सरकारनं आरबीआयच्या सल्ल्यानं ऑनलाइन अर्ज आणि पेमेंट केलं तर 50 रुपये प्रति ग्रॅम सूट दिलीय. 2. 2.5 टक्के वर्षाला व्याज - या योजनेअंतर्गत इनिशियल इन्व्हेस्टमेंटवर 2.5 टक्के वर्षाला व्याज मिळेल. आर्मी पब्लिक स्कूलमध्ये 8 हजार जागांवर भरती, ‘या’ उमेदवारांनी करावा अर्ज 3. भांडवली उत्पन्न करातही होऊ शकते बचत - बाॅण्डची किंमत सोन्याच्या किमतीतल्या अस्थिरतेवर अवलंबून असते. सोन्याच्या किमतीत होणाऱ्या घसरणीमुळे गोल्ड बाॅण्डवर नकारात्मक रिटर्न मिळतात. या अस्थिरतेला कमी करण्यासाठी सरकार दीर्घ काळाचे गोल्ड बाॅण्ड जारी करते. याच्या गुंतवणुकीचा काळ 8 वर्ष असतो. पण तुम्ही 5 वर्षांनी तुमचे पैसे काढून घेऊ शकता. 5 वर्षानंतर पैसे काढल्यानंतर भांडवली उत्पन्न कर लावला जात नाही. ऑफिसच्या नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटप्रमाणे असतो. VIDEO: मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी गणरायाचरणी लीन

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या