नवी दिल्ली, 14 जानेवारी : अमेरिका आणि चीन यांच्यात व्यापारविषयक करार होण्याची चिन्हं असल्याने जगभरात सोन्याच्या किंमती (Gold Price Down)खाली आल्या आहेत. याचा परिणाम भारतातल्या बाजारावरही झालाय. सोन्याच्या किंमती 61 रुपयांनी कमी झाल्यात. त्याचवेळी चांदीचे दरही खाली आले. चांदीच्या किंमती 602 रुपयांनी घसरल्या आहेत. सोन्याच्या किंमतींनी 8 जानेवारीला उच्चांक गाठला होता. आता मात्र हे भाव घटले आहेत. दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचे भाव 40 हजार 422 रुपये प्रतितोळा झालेत. चांदीचे नवे दर सोन्याप्रमाणेच चांदीच्या किंमतीही कोसळल्या आहेत.चांदीचे भाव 47 हजार 83 रुपये प्रतिकिलो झाले. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत 1 हजार 544 डॉलर प्रतिऔंस तर चांदी 17. 75 डॉलर प्रतिऔंस झाली. (हेही वाचा : ATM मधून पैसे काढताना या लाइटवर ठेवा लक्ष, नाहीतर रिकामं होईल तुमचं बँक खातं) HDFC सिक्युरिटीजचे सीनिअर अॅनॅलिस्ट तपन पटेल यांच्या म्हणण्यानुसार, डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाल्याने विदेशी बाजारात सोन्याची विक्री झाल्याने घरगुती बाजारात सोन्याचे भाव कमी झालेत. सोन्याच्या दागिन्यांबदद्ल नवा नियम 15 जानेवारीपासून सोन्याच्या दागिन्यांसाठी हॉलमार्किंग सक्तीचं करण्याचा नियम लागू होतोय. सोन्याच्या दागिन्यांमध्ये सोनं किती शुद्ध आहे हे दाखवणारं प्रमाणपत्र हॉलमार्किंगमध्ये दिलं जातं. नव्या नियमांनुसार सोन्याच्या दागिन्यांसाठी हॉलमार्किंग सक्तीचं करण्यात आलं आहे. यासाठी सराफांना दागिन्यांचं लायसन्स घ्यावं लागेल. (हेही वाचा : SBI च्या 42 कोटी ग्राहकांना धक्का, FD वरचे व्याजदर घटवले) वेगवेगळ्या शहरात वेगवेगळे भाव तुम्ही सराफाकडून जे सोनं खरेदी करता त्याच्या किंमती स्पॉट प्राइस या न्यायाने ठरतात. बहुतांश शहरात सराफांच्या संघटनेचे सदस्य मिळून बाजार सुरू होण्याच्या वेळी सोन्याचे भाव ठरवतात. त्यामुळे वेगवेगळ्या शहरात सोन्याचे भाव वेगवेगळे असतात. ==================================================================================