JOIN US
मराठी बातम्या / मनी / Gold-Silver Prices Today: किती घटले सोन्याचांदीचे दर? इथे वाचा लेटेस्ट किमती

Gold-Silver Prices Today: किती घटले सोन्याचांदीचे दर? इथे वाचा लेटेस्ट किमती

Gold Silver Rate Today: गेल्या काही दिवसांपासून सोन्याचांदीच्या किमतीत होत असलेल्या चढउतारादरम्यान सोन्याच्या किमती 48 हजारांपेक्षा कमी झाल्या आहेत तर चांदी 62 हजारांच्या खाली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 13 जानेवारी: गेल्या काही दिवसांपासून सोन्याचांदीच्या किमतीत (Gold Silver Rate Today) होत असलेल्या चढउतारादरम्यान सोन्याच्या किमती 48 हजारांपेक्षा कमी झाल्या आहेत तर चांदी 62 हजारांच्या खाली आहे. आज मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (Gold Rate on MCX) सोन्याचे दर 0.01 टक्क्यांच्या किरकोळ तेजीसह ट्रेड करत आहेत. तर चांदीच्या किंमतीत (Silver Rate on MCX) 0.08 टक्क्यांची तेजी आली आहे. किती स्वस्त झाले सोन्याचे दर? एमसीएक्सवर सोन्याचे दर 0.01 टक्क्यांनी कमी झाल्यानंतर 47,659 रुपये प्रति तोळावर पोहोचले आहेत. तर आजच्या ट्रेडिंगमध्ये चांदीचे दर 0.08 टक्के तेजीनंतर 61,030 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचले आहेत. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याचे दर आतापर्यंतच्या सर्वोच्च (Gold Rate on Record High Level) स्तरावर अर्थात 56200 रुपये प्रति तोळा या स्तरावर पोहोचले होते. आज सोन्याचे दर 47,659 रुपये प्रति तोळावर आहेत. अर्थात आता सोन्याचे दर जवळपास  8541 रुपयांपेक्षा अधिक दराने स्वस्त आहेत. हे वाचा- महागाईचा झटका! साबण-डिटर्जंट महागले, गव्हाचे पीठ आणि तांदळाचे दरही वधारले महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांमधील सोन्याचा दर

शहरआजचा दर (प्रति तोळा)कालचा दर (प्रति तोळा)
मुंबई48950 रुपये48940 रुपये
पुणे48640 रुपये48630 रुपये
नाशिक48640 रुपये48630 रुपये
नागपूर48950 रुपये48940 रुपये

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील 22 कॅरेट सोन्याचा दर

शहरआजचा दर (प्रति तोळा)कालचा दर (प्रति तोळा)
मुंबई46950 रुपये46940 रुपये
पुणे46130 रुपये46120 रुपये
नाशिक46130 रुपये46120 रुपये
नागपूर46950 रुपये46940 रुपये

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये चांदीचा दर

शहरआजचा दर (प्रति किलो)कालचा दर (प्रति किलो)
मुंबई62000 रुपये65000 रुपये
पुणे62000 रुपये65000 रुपये
नाशिक62000 रुपये65000 रुपये
नागपूर62000 रुपये65000 रुपये

घरबसल्या जाणून घ्या सोन्याचा दर सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्याचे नवे दर पाहू शकता. हे वाचा- Gold Gift Tax: गिफ्ट मिळालेल्या सोन्यावरही द्यावा लागतो टॅक्स, वाचा काय आहे नियम कशी तपासाल सोन्याची शुद्धता तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवले आहे. ‘BIS Care App’द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या