नवी दिल्ली, 22 जून: गेल्या आठवड्यात सोन्याचे दर (Gold Price Today) मोठ्या प्रमाणात कमी झाले होते. आज भारतीय बाजारात (Gold Rates in Indian Market) सोन्याच्या दरात उसळी पाहायला मिळते आहे तर चांदीचे दर (Silver Price Today) कमी झाले आहेत. एमसीएक्सवर (Multi Commodity Exchange MCX) सोन्याची वायदे किंमत 0.24% नी वाढून 47,185 प्रति तोळा झाली आहे. तर चांदीचे दर 0.05% कमी होऊन 67,730 प्रति किलोवर पोहोचले आहेत. गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे दर मात्र कमी होत आहेत. तज्ज्ञांच्या मते एमसीएक्सवर सोन्याचे दर 46800-46600 रुपये या स्तरावर राहतील. गेल्या आठवड्यात सोन्याच्या किंमतीत 4 टक्क्यांची घसरण झाली आहे. सध्याचे दर गेल्यावर्षीच्या सर्वोच्च दरापेक्षा (Record High) 18 टक्क्यांनी कमी आहेत. त्यामुळे तज्ज्ञांच्या मते सोनेखरेदी करण्याची हीच योग्य वेळ आहे. सर्वोच्च स्तरावरून 9000 रुपयांनी स्वस्त आहेत सोन्याचे दर गेल्यावर्षी कोरोना काळात सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून अनेकांनी सोन्यामध्ये गुंतवणूक केली होती. ऑगस्ट 2020 मध्ये एमसीएक्सवर सोन्याचा भाव 56191 रुपये प्रति तोळाच्या सर्वोच्च स्तरावर होता. आज ऑगस्टच्या सोन्याची वायदे किंमत 47,185 रुपये प्रति तोळा आहे. अर्थात सोन्याचे दर 9000 रुपयांनी स्वस्त झाले आहेत. अर्थात गेल्यावर्षीच्या सर्वोच्च स्तरावर पोहोचलेल्या सोन्यापेक्षा तुम्ही 9000 रुपये स्वस्त किंमतीत सोनं खरेदी करू शकता. हे वाचा- SBI च्या 40 कोटींहून अधिक ग्राहकांसाठी अलर्ट! आता ATM मधून पैसे काढणं महागणार आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर आज स्थिर होते. स्पॉट गोल्डची किंमत किरकोळ बदलानंतर 1,784.14 डॉलर प्रति औंस झाली आहे. कॅपिटलविया इन्व्हेस्टमेंट अॅडव्हायजरने अशी माहिती दिली की तांत्रिक दृष्या आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर किरकोळ तेजीनंतर $1760- $ 1770 वरून $1800 च्या स्तरावर पोहोचू शकतात. कशाप्रकारे तपासाल सोन्याची शुद्धता? जर तुम्हाला आता सोन्याची शुद्धता तपासून पाहायची असेल तर यासाठी सरकारकडून एक अॅप तयार करण्यात आले आहे. ‘बीआयएस केअर अॅप’ (BIS Care app) च्या माध्यमातून तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधात तक्रार देखील करू शकता. या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळल्यास ग्राहक त्वरित तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकांना त्वरित तक्रार नोंदविण्याची माहितीही मिळेल