JOIN US
मराठी बातम्या / मनी / Gold Price Today: धनत्रयोदशी वधारला सोन्याचा भाव, चांदीही महागली; पाहा आजचा लेटेस्ट रेट

Gold Price Today: धनत्रयोदशी वधारला सोन्याचा भाव, चांदीही महागली; पाहा आजचा लेटेस्ट रेट

धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या खरेदीमुळे आज सोने दरात वाढीची नोंद झाली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 2 नोव्हेंबर : धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या खरेदीमुळे आज सोने दरात वाढीची नोंद झाली आहे. दिल्ली सराफा बाजारात आज 2 नोव्हेंबर 2021 रोजी गोल्ड रेट (Gold Price Today) आतापर्यंत 47000 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या जवळ पोहोचला आहे. चांदीच्या दरातही (Silver Price Today) आज वाढ झाली आहे. मागील सत्रात दिल्ली सराफा बाजारात सोने दर 46,792 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. तर चांदीचा दर 63,288 रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाला होता. आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोने-चांदी दरात मोठे बदल झालेले नाहीत. धनत्रयोदशी सोनं दर 9,356 रुपये स्वस्त - दिल्ली सराफा बाजारात मंगळवारी धनत्रयोदशीच्या दिवशी सोने दरात 53 रुपये प्रति 10 ग्रॅमची वाढ झाली. त्यामुळे राष्ट्रीय राजधानी दिल्लीत 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याचा भाव 46,844 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत सोनं आपल्या रेकॉर्ड स्तरावरुन 9,356 रुपये प्रति 10 ग्रॅम स्वस्त आहे. ऑगस्ट 2020 मध्ये सोने दर 56,200 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या सर्वोच्च स्तरावर पोहोचला होता. चांदीचा लेटेस्ट रेट - चांदीच्या दरातही आज वाढ झाली. दिल्ली सराफा बाजारात मंगळवारी चांदीचा भाव 45 रुपयांच्या वाढीसह 63,333 रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाला.

धनत्रयोदशीला खरेदी करताय सोनं? लक्षात ठेवा या 5 गोष्टी, अन्यथा होईल नुकसान

सोने दरात वाढ का? एचडीएफसी सिक्योरिटीजचे (HDFC Security) सिनियर एनालिस्ट तपन पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज कॉमेक्सवर गोल्ड दरात स्थिरता होती, त्यामुळे भारतीय सराफा बाजारात सोने दरात काहीशा वाढीची नोंद झाली.

Diwali 2021: धनत्रयोदशीला सोनं खरेदी करताना टॅक्सबद्दल ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

अशाप्रकारे तपासा सोन्याची शुद्धता - जर तुम्हाला आता सोन्याची शुद्धता तपासून पाहायची असेल तर यासाठी सरकारकडून एक अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. ‘बीआयएस केअर अ‍ॅप’ (BIS Care app) च्या माध्यमातून तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता. या अ‍ॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधात तक्रार देखील करू शकता. या अ‍ॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळल्यास ग्राहक त्वरित तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकांना त्वरित तक्रार नोंदविण्याची माहितीही मिळेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या