JOIN US
मराठी बातम्या / मनी / Aadhar Instant Loan: पैशांचे अडचण असेल तर आधार कार्ड करेल मदत; तातडीने लोन घ्या

Aadhar Instant Loan: पैशांचे अडचण असेल तर आधार कार्ड करेल मदत; तातडीने लोन घ्या

आधार कार्डच्या मदतीने तुम्ही सहजपणे वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करू शकता. स्टेट बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक, कोटक महिंद्रा बँक इत्यादी अनेक बँका त्यांच्या ग्राहकांना आधार कार्डवर सहजपणे कर्ज देतात.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 17 जून : आधार कार्ड (Aadhar Card) आज एक महत्वाचा पुरावा आहे. सरकारी योजना, बँकांचे व्यवहार किंवा इतर महत्त्वाची कामं आज आधारकार्ड शिवाय पूर्ण होत नाहीत. मात्र आधारकार्डच्या मदतीने तुम्ही कर्जही सहज मिळवू शकता. याबाबत माहिती घेऊयात. कधीकधी आपल्याला अचानक पैशांची गरज भासते. अशा परिस्थितीत, वैयक्तिक कर्ज (Personal Loan) हा एक अतिशय सोपा मार्ग आहे ज्याद्वारे तुम्ही सहजपणे पैशांची व्यवस्था करू शकता. अशावेळी आधार कार्डच्या मदतीने तुम्ही सहजपणे वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करू शकता. स्टेट बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक, कोटक महिंद्रा बँक इत्यादी अनेक बँका त्यांच्या ग्राहकांना आधार कार्डवर सहजपणे कर्ज देतात. एबीपी न्यूजने याबाबतचं वृत्त दिलं आहे. बँकांच्या वसुली एंजट्सना लगाम लागणार; RBI गर्व्हनर शक्तीकांत दास यांची कठोर भूमिका क्रेडिट स्कोअर चांगला असावा कोणत्याही प्रकारचे वैयक्तिक कर्ज घेण्यापूर्वी तुमचा क्रेडिट स्कोअर (Credit Score) नीट तपासा. जर एखाद्या ग्राहकाचा क्रेडिट स्कोअर 750 पेक्षा जास्त असेल तर त्याला सहज कर्ज मिळते. यासोबतच बँक अशा परिस्थितीत कमी व्याजदरही आकारते. आजकाल बहुतेक मोठ्या बँका आणि वित्त कंपन्या KYC नंतर वैयक्तिक कर्ज सहजपणे मंजूर करतात. आधार कार्डद्वारे वैयक्तिक कर्जासाठी अर्ज कसा करायचा. PNB च्या 18 कोटी ग्राहकांना फटका; बँकेकडून ‘ही’ सुविधा तात्काळ बंद करण्याचा निर्णय आधार कार्डच्या मदतीने वैयक्तिक कर्जासाठी अर्ज 1. कर्जासाठी अर्ज करण्यासाठी बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर क्लिक करा. 2. तुम्ही बँकेच्या मोबाईल अॅपवरही वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करू शकता. 3. यानंतर तुम्ही नोंदणी केलेल्या मोबाईल नंबरवर तुम्हाला एक OTP मिळेल. 4. त्यानंतर वैयक्तिक कर्जाचा पर्याय निवडा. 5. पुढे कर्जाची रक्कम भरा. 6. यानंतर, तुमची सर्व आवश्यक माहिती भरा. 7. येथे तुम्ही तुमची जन्मतारीख, पत्ता इत्यादी इतर माहिती भरा. 8. यानंतर आधार आणि पॅन सारख्या आवश्यक कागदपत्रांची प्रत अपलोड करा. 9. शेवटी आधार क्रमांक टाका आणि त्यानंतर बँक तुमच्या तपशीलांची पडताळणी करेल. 10. यानंतर तुमचे कर्ज मंजूर होईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या