नवी दिल्ली, 29 मे: केंद्र सरकारने लोकांना 5 लाख रुपये जिंकण्याची संधी उपलब्ध करुन दिली आहे. ही रक्कम जिंकण्यासाठी तुम्हाला एका स्पर्धेमध्ये सहभागी व्हावं लागेल. केंद्र सरकारकडून ही योजना आखण्यात आली आहे. यामध्ये तुम्हाला बक्षीस स्वरुपात ही रक्कम दिली जाईल. भारत सरकारचे स्वच्छ भारत मिशन आणि संयुक्त राष्ट SDG च्या समर्थनामध्ये, हिंदुस्तान यूनिलिव्हर लिमिटेडने इनव्हेस्ट इंडिया, स्टार्टअप इंडिया आणि AGNIi सह मिळून एक ‘ग्रँड वॉटर सेव्हिंग चॅलेंज’ सुरू केले आहे. काय काम करावं लागेल? या स्पर्धेमध्ये इंडियन टॉयलेट्ससाठी एक अनोखी कल्पक फ्लश सिस्टिम तयार करायची आहे. स्पर्धेचा मुख्य उद्देश शौचालयांची शुद्धता, हायजिन आणि पाणी वाचवणे हा आहे. स्वच्छतेचा थेट परिणाम व्यक्तीच्या आरोग्यावर होतो. सध्याच्या काळात पाणी वाचवणे देखील गरजेचे आहे. शिवाय हायजिनसाठी विशेष खबरदारी घेणं आवश्यक आहे. अशावेळी या अनोख्या उपक्रमाअंतर्गत पाणी वाचवण्यासह स्वच्छतेचा प्रसार करणं हा मानस आहे.
किती आहे बक्षिसाची रक्कम? प्रथम विजेता- या चॅलेंजमध्ये पहिल्या क्रमांकावर येणाऱ्या व्यक्तीला किंवा टीमला पाच लाख रुपये मिळतील द्वितीय विजेता- तर दुसरा क्रमांक मिळवणाऱ्याला देखील 02.50 लाख दिले जाणार आहेत. कुठे कराल रजिस्ट्रेशन? या लिंकवर क्लिक करुन तुम्हाला या चॅलेंजसाठी अर्ज करता येईल- https://www.startupindia.gov.in/content/sih/en/ams-application/challenge.html?applicationId=6050cc03e4b03f92cbc8c95e या स्पर्धेत सहभागी होणाऱ्याची एंट्री स्टार्टअप इंडिया हबवर जमा केली जाते. DPIIT द्वारे नोंदणीकृत स्टार्टअप आणि शैक्षणिक संस्था यामध्ये सहभागी होऊ शकतात. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जून आहे.