मुंबई, 7 जानेवारी : देशात सध्या बरेच लोक शेअर मार्केटकडे वळू लागले आहेत. मात्र, याचा खरोखरच अभ्यास असणारे अगदी कमी लोक आहेत. कोणत्या कंपनीचा शेअर घ्यायचा (Which stock to buy), कोणता स्टॉक चांगले रिटर्न्स देईल, कुठे गुंतवणूक करू नये अशा गोष्टींची सामान्य माणसाला अगदी थोडीच माहिती असते. त्यातही कित्येक लोक दुसऱ्यांचे सल्ले ऐकून शेअर विकत घेतात. अशात मग कित्येक वर्षं गुंतवणूक करूनही योग्य नफा मिळत नाही, किंवा मग कधी कधी तर गुंतवलेले पैसेही हातातून निघून जातात. हे टाळायचं असेल, तर योग्य स्टॉक्स निवडणे गरजेचे आहे. तुम्हीही होऊ शकता एक्सपर्ट कित्येक लोकांना असं वाटतं, की योग्य शेअर निवडणं (choosing stock to buy) हे अगदी गुंतागुंतीचं आणि किचकट काम आहे. तुम्हालाही तसं वाटत असेल, तर थोडं थांबा. खरंतर कोणत्या शेअरमध्ये गुंतवणूक करायची हे ठरवण्यासाठी तुम्हाला शेअर मार्केटमधील तज्ज्ञ (Share market tips) असण्याची गरज नाही. काही ठराविक गोष्टींकडे बारकाईने पाहिल्यास तुम्हीदेखील अगदी पाच मिनिटांत (be share market expert in minutes) शेअर घ्यावा की नको हे ठरवू शकाल. विशेष म्हणजे यासाठी लागणारी माहिती ही इंटरनेटवर क्षणार्धात उपलब्ध होते. आज तक ने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. अर्थसंकल्पाच्या दिवशी शेअर बाजाराची चाल कशी असते? समजून घ्या आणि नियोजन करा कंपनीचा बिझनेस तपासा एखाद्या कंपनीचा शेअर विकत घ्यावा की नाही हे ठरवण्यासाठी सर्वात आधी त्या कंपनीचा बिझनेस कसा सुरू आहे हे तपासणं (Check business of company before buying stocks) गरजेचं आहे. कंपनी छोटी असो वा मोठी, काही मिनिटांमध्ये तुम्ही त्या कंपनीच्या बिझनेसबाबत माहिती मिळवू शकता. अर्थात, मोठ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केल्यास रिस्क फॅक्टर कमी होतो. कंपनीचा बिझनेस कसा सुरू आहे, हे तपासण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला कंपनीचा गेल्या काही वर्षांचा रेव्हेन्यू (Check company revenue) बघावा लागेल. जर कंपनीची वार्षिक उलाढाल (Revenue) दर वर्षी वाढत असेल, तर कंपनीचा बिझनेस चांगला चालला आहे म्हणता येईल. कंपनी नफ्यात असेल, तरच करा गुंतवणूक कित्येक वेळा कंपनीचा रेव्हेन्यू चांगला असतो, मात्र नेट इन्कम (Net Income) वाढताना दिसत नाही. अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणे टाळायला हवे. नेट इन्कमसोबतच कंपनीची संपत्ती (Assets), लाएबिलिटी (Liability) आणि कॅश फ्लो (Cash Flow) या गोष्टीही तपासणं गरजेचं ठरतं. कंपनीची एकूण संपत्ती (Total assets), कॅश फ्लो आणि लाएबिलिटी दरवर्षी वाढत असेल, तर त्याचा अर्थ कंपनी दरवर्षी मोठ्या प्रमाणात नफा (How to check if company is in profit) मिळवत आहे. अशा वेळी तुम्ही डोळे झाकून या कंपनीत गुंतवणूक करू शकता. या गोष्टी वाढत नसतील, तर मात्र इथे गुंतवणूक (Don’t buy share if company is not in profit) करणं धोक्याचं आहे. Omicron मुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा झटका! GDP ग्रोथमध्ये घट होण्याचा अंदाज अशा प्रकारे तुम्ही मोजक्या गोष्टी तपासून, अवघ्या काही मिनिटांमध्येच शेअर विकत घ्यावा की नाही याचा निर्णय घेऊ शकता. अर्थात, ही केवळ बेसिक (Basic share market information) माहिती आहे. याबाबत अधिक माहितीसाठी तुम्ही टिकरटेप (www.tickertape.in) या वेबसाईटला भेट देऊ शकता. तसेच, कोणत्याही स्टॉकमध्ये मोठी गुंतवणूक कऱण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराची मदत नक्की घ्या.