दोन हजारांच्या नोटा बदलण्याची डेडलाइन वाढणार?
नवी दिल्ली, 25 जुलै : भारतीय रिझर्व्ह बँकेने मे महिन्यात 2000 च्या नोटा चलनातून काढून घेण्याची घोषणा केली आहे. या नोटा बँकांमध्ये जमा करण्यासाठी 30 सप्टेंबर ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे. पण, ही डेडलाइन आणखी वाढवण्यात येणार का, असा प्रश्न जनतेच्या मनात आहे. जनतेचा हा सवाल खासदारांनी संसदेत सरकारला विचारला आहे. यावर अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, बँकांमध्ये 2000 रुपयांच्या नोटा जमा करण्याची शेवटची तारीख वाढवली जाणार नाही. म्हणजेच 30 सप्टेंबरपर्यंत तुम्ही तुमच्याकडे ठेवलेल्या 2000 रुपयांच्या नोटा बँकांमध्ये जमा कराव्याच लागतील.
संसदेच्या पावसाळी अधिवेशना एनसीपी खासदार सुप्रिया सुळेंसह अनेक खासदारांनी 2000 च्या नोटांविषयी सरकारला अनेक प्रश्न विचारले. याच्या उत्तरात अर्थ राज्य मंत्री पंकज चौधरी यांनी सर्व प्रश्नांची उत्तरं दिली. 2000 च्या नोटांबाबत सर्वात महत्त्वाचा प्रश्न विचारण्यात आला होता की, सरकार या नोटा बदलून देण्याची अंतिम मुदत सप्टेंबर 2023 नंतर वाढवणार आहे का, जर तसे असेल तर त्याचे डिटेल्स द्या. या प्रश्नाला उत्तर देताना अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी म्हणाले की, सध्या तसा कोणताही विचार नाही. EPF Passbook: घरबसल्यास चेक करा ईपीएफ पासबुक, जाणून घ्या 4 सोप्या ट्रिक! आरबीआयने 2000 च्या नोटा परत घेण्याची घोषणा केली होती काळा पैसा संपवण्यासाठी उच्च मूल्याच्या नोटा चलनातून बाद करण्याचा सरकारचा विचार आहे का, असा आणखी एक प्रश्न सभागृहात विचारण्यात आला. त्यावरही मंत्र्यांनी नकारार्थी उत्तर दिले. रिझर्व्ह बँकेने 19 मे रोजी अचानक 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्याची घोषणा केली होती. Credit Card चं बिल डोकेदुखी बनलंय? ट्राय करा या पद्धती, उतरेल कर्जाचं ओझं आतापर्यंत 76 टक्के नोटा परत आल्या आहेत आरबीआयच्या म्हणण्यानुसार, चलनात असलेल्या 2000 रुपयांच्या 76 टक्के नोटा एकतर बँकांमध्ये जमा झाल्या आहेत किंवा बदलल्या गेल्या आहेत. चलनात असलेल्या 2000 रुपयांच्या नोटा 19 मे रोजी घोषणेच्या दिवशी 3.56 लाख कोटी रुपयांवरून 30 जून रोजी 84,000 कोटी रुपयांवर आल्या आहेत.