FDचे अनेक फायदे पण तोटेही नाहीत कमी, या 5 प्रकारचं होऊ शकतं नुकसान
मुंबई, 5 ऑक्टोबर: मुदत ठेवी अर्थात फिक्स्ड डिपॉझिटचे फायदे बरेच आहेत. जसे की परताव्याचा निश्चित दर, व्याजावरील कर बचत, कार्यकाळाची निवड, सुलभ गुतवणूकीची सुविधा आणि एफडीवर कर्ज इत्यादीमुळं फायदे FDतील गुंतवणूक अत्यंत फायदेशीर बनते. परंतु FD चे काही तोटे देखील आहेत ज्याबद्दल जाणून घेणं महत्वाचं आहे. या तोट्यांमध्ये कमी व्याजदर, निधी लॉक-इन, पैसे काढण्यावर दंड, काही प्रमाणात कर लाभ नाही आणि निश्चित व्याज दर इत्यादींचा समावेश आहे. FDच्या तोट्याबद्दल बोलायचं झाल्यास पहिला मुद्दा म्हणजे व्याजदर कमी असणं. एफडी व्याजदर महागाईला मात देऊ नाही. सध्या रेपो दरात वाढ झाल्यामुळं एफडीचे दर वाढत आहेत, परंतु महागाईच्या तुलनेत एफडी अजूनही मागे आहे. याचा अर्थ FD मध्ये गुंतवणूक केल्यानंतरही तुम्ही महागाई दरापेक्षा जास्त कमाई करत नाही. सध्या दर वाढत आहेत, परंतु पूर्वी एफडीच्या दरांमध्ये सातत्यानं घट होत होती. दुसरा मोठा तोटा निधीच्या लॉक-इनमुळे होतो. जेव्हा पैसे एफडीमध्ये जमा केले जातात, तेव्हा त्याच वेळी एक कालावधी देखील निश्चित केला जातो की तुम्ही इतके वर्षे तुमचे पैसे काढू शकत नाही. प्रतिकूल परिस्थितीत पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध आहे, परंतु दंड भरावा लागेल. यामुळे तुमचे पैसे एक प्रकारे अडकतात. स्वतःचं पैसे काढायला गेल्यावर दंड भरावा लागतो. हे मोठं नुकसान मानलं जातं. म्हणजेच तुमची एफडी रोखीनं रिडीम करणं इतके सोपं नाही. हेही वाचा: पैसे तयार ठेवा! मोठी कंपनी भारतात IPO लाँच करण्याच्या तयारीत आपलेच पैसे काढल्यावर होणारा दंड कोणत्याही ग्राहकासाठी वेदनादायी असतो. त्यातही हे पैसे काढण्यासाठीही त्रास होतो. कोणत्याही अडचणीत स्वत:चे पैसे काढण्याची गरज भासल्यास बँका दंड कापतात. यातही मोठी अडचण अशी आहे की, केवळ दंड म्हणून पैसे घेतले जात नाहीत, तर एफडीचा व्याजदरही कमी केला जातो. बचत खात्यात जमा केलेल्या पैशावर असं होत नाही. बचत खात्यात तुलनेनं कमी व्याज मिळतं, परंतु तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही तुमचे पैसे सहज काढू शकता.
FD मध्ये ग्राहक पैसे जमा करतो जेणेकरून त्याला चांगला परतावा मिळतो. पण जर तुम्हाला त्या रिटर्नवर टॅक्स भरावा लागला तर फायदा कमी होतो. FD वर मिळणारे व्याज ग्राहकाच्या करपात्र उत्पन्नात जोडलं जाते. त्यामुळे मिळालेल्या व्याजावर कोणतीही कर कपात उपलब्ध नाही. तथापि ज्येष्ठ नागरिकांना व्याजावर 50,000 रुपयांपर्यंत सूट मिळते. स्थिर व्याजदराचीही मोठी कमतरता आहे. FD च्या संपूर्ण कालावधीसाठी व्याज दर निश्चित केला जातो. जरी दर वाढले तरी एफडीचा दर तोच असतो जो आधी निश्चित केला होता. ग्राहकांसाठी हा तोट्याचा सौदा ठऱतो.