JOIN US
मराठी बातम्या / मनी / खरं की खोटं: देशातील प्रत्येक नागरिकाला कोरोना रिलिफ फंडातून मिळणार 7500 रुपये?

खरं की खोटं: देशातील प्रत्येक नागरिकाला कोरोना रिलिफ फंडातून मिळणार 7500 रुपये?

सध्या सोशल मीडियावर देशातील प्रत्येक नागरिकाला 7,500 रुपये मोफत मिळत असल्याची चर्चा आहे. व्हॉट्सअॅपवर (Whatsapp) हा मेसेज व्हायरल होत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 11 जून : एकीकडे कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना दुसरीकडे अफवांमध्येही वाढ होत आहे. सध्या सोशल मीडियावर देशातील प्रत्येक नागरिकाला 7,500 रुपये मोफत मिळत असल्याची चर्चा आहे. व्हॉट्सअॅपवर (Whatsapp) हा मेसेज व्हायरल होत आहे. ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की प्रत्येक नागरिकाला 7500 रुपयांचा मदत निधी मोफत देण्यात येत आहे. या व्हायरल मेसेजमध्ये असा दावा करण्यात आला आहे की FG Lockdown Funds अंतर्गत हे पैसे नागरिकांना देण्यात येणार आहेत. व्हायरल मेसेजमध्ये असा दावा केला गेला आहे की एफजी लॉकडाउन फंडामधून लोकांना 7500 रुपये विनामुल्य दिले जात आहेत. एफजीने विनामूल्य पैसे वितरित करण्यास मान्यता दिली आहे. विनामूल्य मदत निधी मिळविण्यासाठी एक लिंक देण्यात आला आहे. यात 7500 रुपये कसे मिळणार हे सांगण्यात आलं आहे. या लिंकवर क्लिक केल्यानंतर वैयक्तिक माहिती द्यावी लागेल. यात असे म्हटले आहे की ही मर्यादित ऑफर आहे. वाचा- खरं आहे की खोटं: 15 जूननंतर देशभरात पुन्हा लागू होणार कडक लॉकडाऊन? मात्र, प्रेस माहिती ब्युरोच्या फॅक्टचेक युनिटने हा मेसेज फेक असल्याचं सांगितलं आहें. PIBने ट्विट केलं आहे की दिलेली लिंक क्लिकबाईट आहे. अशा फसव्या वेबसाइट्स आणि व्हॉट्सअॅपपासून सावध राहा.

वाचा- देशात मृतांचा आकडा 8 हजार पार, तरी एक आनंददायी बातमी काय आहे सत्य? पीआयबी फॅक्ट चेकमध्ये PIB Fact Check) हा व्हायरल मेसेज फेक असल्याचं सिद्ध झालं आहे, तर अशा मेसेजपासून सावध रहा, अन्यथा तुमचे मोठे नुकसान होऊ शकते, असेही सांगण्यात आले आहे. या व्यतिरिक्त आणखी एक मेसेज व्हायरल होत आहे ज्यात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना 10 हजार रुपयांची शिष्यवृत्ती दिली जात आहे. सरकारचा राष्ट्रीय शिष्यवृत्ती 2020च्या माध्यमातून महाविद्यालय विद्यार्थ्यांना दहा हजार रुपयांची शिष्यवृत्ती देत असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र हा मेसेजही फेक असल्याचं समोर आलं आहे. संपादन-प्रियांका गावडे. वाचा- लॉकडाऊनमध्ये ParleG ने मोडले विक्रीचे सारे रेकॉर्ड्स

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या