इलेक्ट्रिक बस
नवी दिल्ली, 4 जुलै : जर्मनी आणि स्वीडन प्रमाणेच येत्या काही वर्षात भारतातही तुम्हाला इलेक्ट्रिक हायवे पाहायला मिळतील. देशातील 2 मोठ्या शहरांची नाव यासाठी ठरवण्यात आली आहेत. या दोन्हींच्या मध्ये तयार होणारा हा जगातील सर्वात लांब इलेक्ट्रिसिटी इनेबल्ड हायवे असेल. इलेक्ट्रिक हायवेसाठी वेगळा रस्ता तयार केला जाणार नाही. तर दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवरच एक डेडिकेटेड लेन विजेवर चालणाऱ्यांसाठी असेल. या लेनच्या वर विजेच्या तार असतील. याच तारांच्या माध्यमातून इलेक्ट्रिक बस आणि ट्रेनला वीज मिळेल. पुढच्या 6 वर्षांमध्ये हा हायवे पूर्णपणे चालू होणार असल्याची आशा आहे. या दोन शहरांची नावं दिल्ली आणि जयपूर आहे.
इलेक्ट्रिक बसेसचा वेग ताशी 100 किलोमीटर असेल. इलेक्ट्रिक हायवे प्रोजेक्टला बिल्ट, ऑपरेट आणि ट्रान्स्फर योजनेंतर्गत उभारण्याची योजना आहे. टाटा आणि सिमन्स सारख्या कंपन्या या प्रकल्पात रस दाखवत आहेत. इलेक्ट्रिक हायवेवर धावणाऱ्या बस आणि ट्रक सामान्य इलेक्ट्रिक वाहनांपेक्षा वेगळ्या असतील. इतर इलेक्ट्रिक उपकरणे ही बॅटरीवर चालतात आणि त्यांना चार्ज करणे आवश्यक असते. मात्र, इलेक्ट्रिक हायवेसाठी बनवलेल्या बस बॅटरीवर धावणार नाहीत. Free Insurance: ‘या’ 4 गोष्टींवर तुम्हाला मिळते फ्री इन्शुरन्स, अनेकांना तर माहितीही नसेल! बसेस रेल्वे आणि मेट्रोप्रमाणे धावतील इलेक्ट्रिक गाड्यांप्रमाणे या बसही इलेक्ट्रिक हायवेवर धावतील. हायवेवरून जाणाऱ्या विद्युत तारांमधून पेंट्रोग्राफच्या माध्यमातून बसला सातत्याने वीजपुरवठा मिळत राहील आणि बस धावत राहील. कारण पॅन्टोग्राफमधून सतत वीज मिळेल यामुळे बसेस पुन्हा पुन्हा चार्ज करण्याची गरज भासणार नाही, तसेच या बसेसमध्ये बॅटरीचा वापरही केला जाणार नाही. ITR Form FY 2022-23: इन्कम टॅक्स रिटर्न फॉर्ममध्ये झालेय 6 बदल, तुम्हाला माहितीये का? इलेक्ट्रिक हायवे म्हणजे काय? इलेक्ट्रिक हायवेवर वाहनांना जमिनीवरून किंवा ओव्हरहेड वायर्समधून वीज दिली जाते. जगाच्या अनेक भागांमध्ये बस आणि ट्रकसाठी इलेक्ट्रिक हायवे बांधले गेले आहेत. या वाहनांना चार्जिंग स्टेशनवर थांबून चार्ज करण्याची गरज नाही. हे ट्रेनच्या उदाहरणावरून समजू शकते. रेल्वे ट्रॅकवरही विजेच्या तारा असल्याचे तुम्ही पाहिले असेल. ट्रेनच्या वर बसवलेला पॅन्टोग्राफ या तारांना जोडतो आणि त्यानंतर ही पॉवर ट्रेनच्या इंजिनमध्ये ट्रान्सफर केली जाते. इलेक्ट्रिक हायवे देखील त्याच प्रकारे काम करतो. इलेक्ट्रॉनिक हायवे कुठे तयार झाले आहेत? जर्मनी आणि स्वीडनमध्ये इलेक्ट्रिक हायवे तयार झाले आहेत. जर्मनीची राजधानी बर्लिनमध्ये जगातील सर्वात मोठा ई-हायवे आहे. याची लांबी जवळपास 109 किलोमीटर आहे. स्वीडनमध्येही इलेक्ट्रिक हायवे आहे. स्वीडन आपल्या अनेक हायवेंना इलेक्ट्रिक हायवेमध्ये रुपांतरीत करण्याच्या दिशेने प्रयत्न करत आहे.