पीएफ अकाउंटमधून कसे काढावे पैसे
मुंबई, 19 मार्च: पीएफ खात्याची देखरेख करणाऱ्या EPFO या संस्थेकडून कर्मचाऱ्यांना गरज पडेल तेव्हा पैसे काढण्याची सुविधा दिली जाते. शिक्षणापासून लग्नापर्यंत सर्व गोष्टींसाठी तुम्ही त्यातून पैसे काढू शकता. दर महिन्याला तुमची नियुक्ती करणारी कंपनी आणि तुमचा हिस्सा तुमच्या पीएफ खात्यात जमा होतो. सरकारने खातेदाराला आपत्कालीन परिस्थितीमध्ये या निधीतील काही भाग काढण्याची परवानगी दिलेली आहे. यासाठी तुम्ही ऑनलाइन अर्जही करू शकता. मात्र नियमांनुसार, तुम्ही केवळ आंशिक रक्कम काढू शकता. EPFO कडून ट्विट करून ही माहिती देण्यात आली आहे. यानुसार कोणताही सदस्य त्याच्या/तिच्या मुलाच्या/मुलीच्या किंवा भाऊ/बहिणीच्या लग्नासाठी सहज पैसे काढू शकतो. पैसे काढण्याची रक्कम व्याजासह एकूण योगदानाच्या 50 टक्क्यांपेक्षा जास्त राहत नाही. मात्र, यासाठी काही अटी आहेत. पैसे काढणाऱ्या सदस्यांना या अटीचे पालन करणं गरजेचं आहे.
तुमचा PF जमा होत असेल तर सावधान! फक्त एक चूक आणि अकाउंट होईल रिकामंयासाठी तुम्हाला EPFO मध्ये किमान 7 वर्षांची सदस्यत्व असायला हवी. याआधी तुम्ही लग्न आणि शिक्षणासाठी तीनपेक्षा जास्त वेळा पैसे काढलेले नसावेत.