JOIN US
मराठी बातम्या / मनी / नोकरदार वर्गाला दिलासा! PF मधून पैसे काढण्यासाठी आता द्यावी लागणार नाहीत ही कागदपत्र

नोकरदार वर्गाला दिलासा! PF मधून पैसे काढण्यासाठी आता द्यावी लागणार नाहीत ही कागदपत्र

EPFO अशी माहिती दिली आहे की, महामारी कोव्हिड-19 च्या संकटासंबंधित पैसे काढण्याचा क्लेम फाइल करण्यास ईपीएफ सदस्याला (EPF Member) कोणतेही प्रमाणपत्र किंवा दस्तावेज जमा करण्याची आवश्यकता नाही.

जाहिरात

एखाद्याच्या नशिब कधी आणि कसं पलटेल याचा काही नेम नसतो. असाच एक आश्चर्यकारक प्रकार समोर आला आहे. अरबी इथं राहणाऱ्या एका भारतीय वंशाच्या शिक्षिकेचं एका क्षणात आयुष्य बदललं आहे. या शिक्षिकेला रफल ड्रामध्ये चक्क 1 मिलियन अमेरिकी डॉलरचा जॅकपॉट लागला आहे.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 09 जुलै : सरकारने कोरोना व्हायरसच्या संकटकाळात नोकरदारवर्गाला मोठा दिलासा दिला आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) अशी माहिती दिली आहे की, महामारी कोव्हिड-19 च्या संकटासंबंधित पैसे काढण्याचा क्लेम फाइल करण्यास ईपीएफ सदस्याला (EPF Member) कोणतेही प्रमाणपत्र किंवा दस्तावेज जमा करण्याची आवश्यकता नाही. या निर्णयामुळे कोरोनाच्या संकटकाळात पीएफमधून पैसे काढणे अधिक सोपे झाले आहे. याआधी सरकारने कोरोनाच्या संकटकाळात ईपीएफ सदस्यांना त्यांच्या पीएफ खात्यातून 3 महिन्याच्या पगाराइतकी रक्कम काढण्याची सूट दिली होती. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने याबाबत ट्वीट करून माहिती दिली आहे. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून असे सांगितले आहे की, ‘कोव्हिड 19 संकटाच्या (outbreak of pandemic-COVID19) संबंधित पैसे काढण्यासाठी EPF सदस्याला कोणतेही प्रमाणपत्र किंवा दस्तावेज जमा करण्याची आवश्यकता नाही’. (हे वाचा- सोन्याचे रेकॉर्ड ब्रेकिंग दर कायम, लवकरच 50 हजारांचा टप्पा पार करण्याची शक्यता )

ईपीएफओ संबंधित अपडेटेड माहिती जाणून घेण्यासाठी EPFO ने त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म पाहण्याचा सल्ला दिला आहे. (हे वाचा- रोज 7 रुपयांची बचत करून मिळवा 60,000 रुपये पेन्शन, सरकारने बदलले या योजनेचे नियम ) फेसबुक- @socialepfo ट्विटर- @socialepfo यूट्यूब- @Employees’ Provident Fund Organitsation या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या आधारे वेळोवेळी तुम्ही पीएफ संदर्भात माहिती मिळवू शकता. ऑनलाइन EPF ट्रान्सफर EPFOकडून पीएफ ट्रान्सफर करण्यासाठी ऑनलाइन सुविधेचा देखील वापर करू शकता. यूनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) आल्यानंतर कर्मचाऱ्याचे पैसे वेगवेगळ्या खात्यामध्ये मात्र एकाच ठिकाणी असतात. त्याकरता नवीन कंपनीमध्ये रूजू झाल्यानंतर त्यांना तुमचा UAN नंबर देणे आवश्यक आहे. त्यानंतर तुम्ही नवीन खात्यामध्ये जुन्या खात्यातील पैसे ट्रान्सफर करून घेऊ शकता. काही स्टेप्ट फॉलो करून ही प्रक्रिया तुम्ही ऑनलाइन पार पाडू शकता.

https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ या लिंकवर जाऊन पीएफमधील पैसे ऑनलाइन ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया पूर्ण करता येईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या