JOIN US
मराठी बातम्या / मनी / EPFO : मोदी सरकारने दिली गुड न्यूज! PF वरील व्याज वाढवण्याची घोषणा

EPFO : मोदी सरकारने दिली गुड न्यूज! PF वरील व्याज वाढवण्याची घोषणा

EPFO अकाउंटवर मिळणाऱ्या व्याजदरांमध्ये वाढ करण्याची घोषणा मोदी सरकारकडून करण्यात आली आहे. आजच यासंदर्भातील सर्कुलर जारी करण्यात आलाय.

जाहिरात

ईपीएफओ इंट्रेस्ट रेट

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 24 जुलै : देशभरात कोट्यवधी लोकांचे ईपीएफओ अकाउंट आहे. या कोट्यवधी लोकांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण मोदी सरकारने EPFO अकाउंटवर मिळणाऱ्या व्याजदरांमध्ये वाढ करण्याची घोषणा केली आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना ( EPFO ) ने आर्थिक वर्ष 2022-23 साठी EPF खात्याचा व्याज दर 8.15 टक्के घोषित केला आहे. यापूर्वी हा व्याजदर 8.10 टक्के होता. केंद्रीय वित्त मंत्रालयाने भविष्य निर्वाह निधीच्या योगदानाच्या व्याज दरात वाढ केल्यास सूचित केले आहे. ईपीएफओने यासंदर्भात एक अधिसूचना जारी केली आहे. त्यात असे म्हटले आहे की भारत सरकारच्या कामगार व रोजगार मंत्रालयाने ईपीएफच्या प्रत्येक सदस्याच्या अकाउंटमध्ये वर्ष 2022-2023 साठी व्याज जमा करण्यासाठी कर्मचारी भविष्य निधी योजना, 1952 च्या पॅरा 60 (1) अंतर्गत केंद्र सरकारीची मंजुरी दिली आहे. लग्नासाठी सहज काढता येईल EPFO चा पैसा, फक्त लक्षात ठेवा ‘या’ अटी आज जारी करण्यात आलं परिपत्रक EPFO अकाउंटवरील व्याजदरात वाढ करण्याच्या घोषणेशी संबंधित परिपत्रक सोमवार, 24 जुलै रोजी जारी करण्यात आले आहे. महत्त्वाचं म्हणजे, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या मंडळाने 2022-23 या आर्थिक वर्षासाठी EPF खात्यावर 8.15 टक्के व्याजदर निश्चित केला होता आणि तो मंजुरीसाठी वित्त मंत्रालयाकडे पाठवला होता. माहितीनुसार, ऑगस्ट 2023 पासून व्याजाचे पैसे खात्यात पोहोचण्यास सुरुवात होईल. EPF Passbook: घरबसल्यास चेक करा ईपीएफ पासबुक, जाणून घ्या 4 सोप्या ट्रिक! EPFO बोर्डने मार्चमध्ये दिला होता प्रस्ताव कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने जारी केलेल्या सर्कुलरनुसार, बोर्डाने यावर्षी मार्चमध्ये व्याजदर 8.10 टक्क्यांवरून 8.15 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव दिलेला होता. रिपोर्टनुसार, CBT च्या शिफारशीनंतर, व्याज दर वित्त मंत्रालयाकडून अधिसूचित केले जातात. त्यानंतरच ते EPFO ​​मेंबर्सच्या अकाउंटमध्ये जमा केले जाऊ शकतात. सामान्यतः, व्याजदर वित्त मंत्रालयाकडून आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत अधिसूचित केला जातो आणि ग्राहक FY23 च्या अधिसूचनेची वाट पाहत होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या