JOIN US
मराठी बातम्या / मनी / EPFO Pension: जास्त पेन्शन हवी असल्यास असा करा अर्ज, 3 मेपर्यंत करता येईल अप्लाय!

EPFO Pension: जास्त पेन्शन हवी असल्यास असा करा अर्ज, 3 मेपर्यंत करता येईल अप्लाय!

EPFO Higher Pension: ईपीएफओने एक परिपत्रक जारी करून अधिक पेन्शनसाठी अर्ज कसा करावा हे सांगितले. यासाठी तुम्ही 3 मे पर्यंत अर्ज करू शकता.

जाहिरात

ईपीएफओ पेन्शन

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 28 एप्रिल: तुम्हालाही रिटायरमेंटनंतर अधिक पेन्शन मिळवायची असेल तर आता कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच EPFO ​​ने तुमच्यासाठी हे काम सोपं केलंय. पण घाई करा, कारण अधिक पेन्शनसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 मे आहे. ईपीएफओने याविषयी एक नवीन परिपत्रक जारी केलंय. ज्यामध्ये अधिक पेन्शनसाठी अर्ज कसा करायचा हे सांगण्यात आलंय. यासोबतच व्हॅलिडेशन अर्थात व्हेरिफिकेशन ऑफ जॉइंट ऑप्शनची पद्धतही स्पष्ट करण्यात आलीये. यासोबतच तुम्हाला तुमच्या नियोक्त्याने दिलेल्या तुमच्या पगाराचे डिटेल्स आणि माहिती तपासण्याची प्रक्रियाही सांगण्यात आली आहे.

23 एप्रिल रोजी जारी केलेल्या परिपत्रकात, EPFO ​​ने म्हटले आहे की, फील्ड ऑफिस संयुक्त पर्याय आणि उच्च पेन्शनसाठी अर्जांची तपासणी करतील. सर्व आवश्यकता पूर्ण झाल्यास, नियोक्त्यांनी दिलेली माहिती क्षेत्रीय कार्यालयाद्वारे व्हेरिफाय केली जाईल. EPFO ने 1 सप्टेंबर 2014 रोजी किंवा त्यापूर्वी निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून अर्ज प्राप्त करण्यासाठी ऑनलाइन प्रणाली देखील सुरू केली आहे, जी 3 मे पर्यंत वैध असेल.

सहज सोडवल्या जातील पेन्शनशी संबंधित तक्रारी

EPFO ने तक्रार निवारण यंत्रणा देखील सुरू केलीये. म्हणजेच पेन्शनशी संबंधित तक्रारींचे निवारण करण्यासाठी निवारण यंत्रणा उभारण्यात आली आहे. याद्वारे, EPFO ​​च्या तक्रार व्यवस्थापन प्रणालीवर EPFIGMS वर कोणतीही तक्रार नोंदवता येईल. उच्चतम पेन्शनच्या श्रेणी अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाने 4 नोव्हेंबर 2022 रोजी दिलेल्या निर्णयाच्या संदर्भात तक्रार दाखल केली जाईल. ईपीएफओच्या म्हणण्यानुसार, पेन्शनशी संबंधित सर्व तक्रारी नियुक्त अधिकाऱ्यांच्या स्तरावर सोडवल्या जातील.

तुम्हीही होम लोन घेतलंय का? कधीच करु नका या चुका, अन्यथा

तक्रार नोंदवताना तपशील जुळत नसल्यास, सहाय्यक भविष्य निर्वाह निधी आयुक्त (APFC)/प्रादेशिक भविष्य निर्वाह निधी आयुक्त (RPFC)-II निवृत्तीवेतनधारकांना एका महिन्याच्या आत सूचना देऊन नियोक्त्यांकडून डिटेल्स मागवतील. यानंतर, जर संपूर्ण माहिती प्राप्त झाली, तर EPFO ​​त्यानुसार थकबाकी भरण्याची प्रक्रिया पुढे जाईल. दुसरीकडे, डिटेल्स प्राप्त न झाल्यास, गुणवत्तेच्या आधारावर आदेश पारित केला जाईल. FO आणि नियोक्ता यांचे तपशील जुळल्यास, APFC/RPFC-II/RPFC-I द्वारे अर्जदाराच्या देय रकमेची गणना करण्यासाठी आणि पेंशनधारकाच्या खात्यात ते ट्रान्सफर करण्यासाठी आदेश जारी करण्यात येईल. ज्या प्रकरणांमध्ये तपशील जुळत नाहीत, नियोक्ता आणि कर्मचारी/पेन्शनधारक यांना APFC/RPFC-II द्वारे सूचित केले जाईल. यासोबतच त्यांना माहिती पूर्ण करण्यासाठी एक महिन्याचा वेळ दिला जाईल.

FD साठी पैसे गुंतवण्याची घाई करेल नुकसान, कोण देतंय जास्त रिटर्न इथे चेक करा

संबंधित बातम्या

प्रत्येक अडचण सोपी होईल

जर उच्च निवृत्ती वेतन किंवा जॉइंट ऑप्शनसाठी अर्ज कोणत्याही कारणास्तव स्वीकारला गेला नाही, तर नियोक्त्याला आवश्यक माहिती सादर करण्याची किंवा पेन्शनधारकांनी सादर केलेल्या तपशीलांसह कोणत्याही तपशीलात सुधारणा करण्याची संधी दिली जाईल. ही ऑनलाइन विंडो एक महिना सुरू राहील.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या