JOIN US
मराठी बातम्या / मनी / …तर बक्षीस म्हणून Elon Musk देणार 729 कोटी रुपये, ही आहे अट

…तर बक्षीस म्हणून Elon Musk देणार 729 कोटी रुपये, ही आहे अट

टेस्लाचे (Tesla) चे सर्वेसर्वा Elon Musk यांनी 100 मिलियन डॉलरचा पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे. वाचा याकरता काय अट आहे

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 22 जानेवारी: टेस्लाचे (Tesla) चे सीईओ एलॉन मस्क (Elon Musk) यांचे ट्वीट्स अनेकदा आश्चर्यकारक असतात. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती झाल्यानंतर त्यांच्या एका ट्वीटने अनेकांची मनं जिंकली होती. दरम्यान आता त्यांचे आणखी एक ट्वीट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलं आहे. SpaceX, Tesla पासून द बोरिंग कंपनी (The Boring Company) चे संस्थापक असणाऱ्या मस्क यांनी 100 मिलियन डॉलरचे बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. बेस्ट कार्बन कॅप्चर टेक्नॉलॉजी (Carbon Capture Technology) ची माहिती देणाऱ्याला हे बक्षीस देण्यात येणार आहे. 100 मिलियन डॉलर म्हणजे भारतीय रुपयात ही किंमत साधारण 729 कोटी रुपये होते. काही दिवसांपूर्वी मस्क जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या स्थानावर होते, मस्क यांची एकूण संपत्ती 201 अब्ज डॉलर इतकी आहे. एलॉन मस्क यांनी जी बक्षिसाची घोषणा केली आहे त्याबाबतचे ट्वीट करताना असे म्हटले आहे की, ‘बेस्ट कार्बन कॅप्चर टेक्नॉलॉजीसाठी मी 100 मिलियन डॉलर डोनेट करणार आहे.’ आणखी एक ट्वीट करत त्यांनी असं म्हटलं आहे की, ‘डिटेल्स पुढील आठवड्यात.’ (हे वाचा- सेक्शन 80सी मधील कर सवलतीची मर्यादा वाढली तर; PPF, NSC, LIC पैकी काय ठरेल BEST )

संबंधित बातम्या

मस्क यांनी का केली कार्बन कॅप्चर टेक्नॉलॉजीबाबत बक्षिसाची घोषणा? एलॉन मस्क यांनी केलेली घोषणा त्यांच्या विविध प्रकारच्या उद्योगांशी संबंधित आहे. अलीकडे त्यांचे विविध उद्योग पर्यावरण समस्या संपवण्यासाठी तांत्रिक उपाय शोधत आहेत. वातावरणातील बदल संतुलित ठेवण्यासाठी अनेक प्लँट्समधून उत्सर्जन रोखणे हे देखील त्यापैकी एक आहे. दरम्यान या तंत्रज्ञानाचा अद्याप इतका विकास झाला नाही आहे. सध्या, हवेतून कार्बन काढून टाकण्याऐवजी त्याचे उत्सर्जन कमी करण्यावर विशेष लक्ष दिले जात आहे. गेल्या वर्षीच आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीने असे सांगितले होते की असे तंत्रज्ञान लवकरात लवकर आणण्याची आवश्यकता आहे, ज्यामुळे कार्बन कॅप्चर करता येईल.  जगातील बर्‍याच देशांमध्ये, नेट-झिरो कार्बन उत्सर्जनाचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी हे आवश्यक असेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या