JOIN US
मराठी बातम्या / मनी / Online Money: ऑनलाइन जाहिरात पाहून किंवा मेल वाचून पैसे कमावण्याची संधी, वाचा काय आहेत सोपे मार्ग

Online Money: ऑनलाइन जाहिरात पाहून किंवा मेल वाचून पैसे कमावण्याची संधी, वाचा काय आहेत सोपे मार्ग

आजकाल प्रत्येकाचा सर्वाधिक वेळ इंटरनेटवर जात असतो. पण इंटरनेटच्या माध्यमातून तुम्ही चांगली कमाई देखील करू शकता. वाचा कशाप्रकारे तुम्हाला या वेबसाइट्सचा वापर करून कशी कमाई करता येईल

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 14 मार्च: पैसे कमावण्याची इच्छा प्रत्येकाची असते. आजकाल शेअर्स, म्युच्यूअल फंड्सच्या माध्यमातून कमाई करण्याचं प्रमाण वाढलं आहे. मात्र या पद्धती सर्वांनाच शक्य होतात असे नाही, अशावेळी तुम्ही काही सोप्या पद्धती वापरून ऑनलाइन पैसे कमावू शकता. घरबसल्या ही कमाई करता येईल. वाढत्या स्पर्धेच्या दरम्यान ऑनलाइन पैसे कमविणे आता तितकेसे सोपे नसले तरी आरामात पैसे कमविण्याचे काही पर्याय आता उघडले आहेत. जाणून घ्या ऑनलाइन पैसे कमावण्याच्या विविध पद्धतींबद्दल … 1. PTC साइट्सवरून करा कमाई घरबसल्या पैसे कमावण्यासाठी तुम्ही paid-to-click (PTC) वेबसाइटवर जाऊ शकता. याठिकाणी तुम्हाला नोंदणी करावी लागेल.  ClixSense.com, BuxP आणि NeoBux यांसारख्या PTC वेबसाइट्सवर जाऊन तुम्हाला केवळ जाहिरांतीवर क्लिक करावे लागेल. जाहिरात पाहण्यासाठी कंपनी तुम्हाला पैसे देईल 2. सोशल मीडियावर करा प्रमोट तुम्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कंपनीबद्दल आणि त्यांच्या उत्पादनांबद्दल लिहून पैसा कमावू शकता. येथे कंपनी व्यवसायाशी संबंधित पोस्टसाठी पैसे देते. या प्रायोजित पोस्टमध्ये फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटर सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कंपनीच्या उत्पादनांविषयी पोस्ट करणे आणि त्याविषयी बोलणे समाविष्ट आहे. (हे वाचा- भारतात येणार डिजिटल चलन, RBI ने दिले महत्त्वाचे संकेत ) 3. VIDEO पाहून कमवा पैसे तुम्हाला टीव्ही पाहणे आवडत असेल तर तुम्ही हे छोटे व्हिडीओ पाहून पैसे मिळवू शकता. यासाठी तुम्हाला रिसर्च कंपनी नीलसनकडे संपर्क करावा लागेल किंवा तुमच्या डिव्हाइसवर उत्पादन पाहण्यासाठी नेटफ्लिक्स टॅगर घ्यावे लागेल आणि याकरता पेमेंट करावे लागेल. इनबॉक्सडॉल्सचे अन्य खेळाडू आहेत जे तुम्हाला व्हिडीओ पाहण्यासाठी रोख पैसे देतात. 4.नवीन App इन्स्टॉल करा काही अॅप्स आहेत जे इन्स्टॉल करून तुम्ही पैसे कमावू शकता. हे आहेत ते महत्त्वाचे Apps- स्क्रीनलिफ्ट, फ्रंटो, स्‍लाइडजॉय, Sweatcoin, इबोटा या अॅपच्या माध्यमातून तुम्ही कॅशबॅक स्वरुपात आणि पॉइंट्सच्या स्वरुपात कमाई करू शकता. 5. गेम खेळून पैसे काही गेम खेळून तुम्हाला पैसे कमावता येतील.  यामध्ये सेकंड लाइफ, स्वॅगबक्स, लकटॅस्टिक आणि मिस्टप्ले यांचा समावेश आहे. या वेबसाइट्सपैकी काही आपल्याला गिफ्ट कार्डद्वारे पैसे देतात तर काही Paypal च्या माध्यमातून पैसे देतात. (हे वाचा- SBI Important Notice: आज नाही मिळणार ही सेवा, वाचा कोणत्या बँक सेवा वापरता येणार ) 6.तुमचे मत मांडून मिळवा पैसे तुम्ही Survey Junkie, Swagbucks, आणि InboxDollar यासारख्या वेबसाइटच्या ऑनलाइन सर्व्हेमध्ये सहभागी होऊन पैसे मिळवू शकता. दरम्यान या साइट्स जास्त पैसे देत नाहीत. तरीदेखील तुम्हील प्रति सर्व्हे 0.50 डॉलर ते 3 डॉलर पर्यंत रक्कम कमावू शकता. 7. जुने गिफ्ट कार्ड विकून करा कमाई तुमच्याकडे जर जुनी गिफ्ट कार्ड असल्यास ते विकून तुम्ही पैसे कमवू शकता. कार्डशॅशद्वारे जुनी गिफ्ट कार्ड्स ऑनलाईन विकून तुम्हाला कॅशबॅक मिळेल. 8. फोटो विकून मिळवा पैसे तुमच्याकडे जुने किंवा नवीन फोटोंनी भरलेले बॉक्स आणि अल्बम आहेत का? आपण स्टॉक फोटोग्राफी वेबसाइट्सद्वारे हे फोटोज विकू शकता.  तुम्ही हे फोटो Shutterstock, Photoshelter आणि  Getty Images यासारख्या लोकप्रिय फोटोग्राफी साइटवर अपलोड करू शकता. यामध्ये सर्वात चांगली बाब अशी आहे की, तुम्हाला प्रत्येक वेळी पेमेंट केले जाईल जेव्हा कुणी तुम्ही काढलेला फोटो खरेदी करेल. 9. मॅट्रिक्स मेल.कॉम ई-मेलद्वारे पैसे कमविण्याकरिता ही वेबसाइट एक चांगला पर्याय आहे. ही वेबसाइट 2002 पासून कार्यरत आहे. या वेबसाइटद्वारे आपण ईमेल वाचून, ऑफरद्वारे, साइटला भेट देऊन आणि त्याबद्दल इतरांना माहिती देऊन पैसे कमावू शकता. आपण 25 ते 50 डॉलर्सपर्यंत म्हणजेच एका तासाला सुमारे 3000 रुपये कमाई करू शकता,

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या