JOIN US
मराठी बातम्या / मनी / खवय्यांना ऑनलाईन फूडसाठी मिळणार आणखी एक पर्याय, झोमॅटो-स्वीगीला अॅमेझॉन देणार टक्कर

खवय्यांना ऑनलाईन फूडसाठी मिळणार आणखी एक पर्याय, झोमॅटो-स्वीगीला अॅमेझॉन देणार टक्कर

वेळी-अवेळी लागणारी भूक किंवा जीभेचे चोचले पुरवण्यासाठी लागणारी भूक यासाठी अनेकांना एक पर्याय अगदी सोपा वाटतो, तो म्हणजे – जेवण ऑनलाईन मागवणं! मात्र आता ऑनलाईन फूड मागवणाऱ्या खवय्यांना आणखी एक पर्याय लवकरच उपलब्ध होणार आहे.

जाहिरात

फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटो (Zomato) ने शनिवारी सांगितले की ते आपल्या महिला आणि ट्रान्सजेंडर कर्मचाऱ्यांना दरवर्षी 10 दिवस 'पीरियड लीव' (Period Leave) देणार आहेत. याबाबत झोमॅटोचे CEO यांनी कर्मचाऱ्यांना एक ईमेलच्या माध्यमातून ही माहिती दिली.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 1 मार्च : वेळी-अवेळी लागणारी भूक किंवा जीभेचे चोचले पुरवण्यासाठी लागणारी भूक यासाठी अनेकांना एक पर्याय अगदी सोपा वाटतो, तो म्हणजे – जेवण ऑनलाईन मागवणं! जेवण ऑनलाईन मागवण्यासाठी झोमॅटो (Zomato), स्विगी (Swiggy) यांसारखे पर्याय उपलब्ध आहेत. आता या यादीमध्ये ई-कॉमर्स जगतातील मोठ्या कंपन्यांपैकी एक असणाऱ्या एका कंपनीचं नाव देखील जोडलं जाणार आहे. त्यामुळे खवय्यांसाठी विविध ठिकाणचे पदार्थ घरपोच मागवण्यासाठी आणखी एक पर्याय उपलब्ध होणार आहे. अमेरिकेतील मोठ्या ई-कॉमर्स कंपन्यांपैकी एक असणारी अॅमेझॉन (Amazon) ही कंपनी भारतीय बाजारात फूड डिलीव्हरीच्या व्यवसायात उतरणार आहे. त्यामुळे अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस भारतातील फूड डिलीव्हरी व्यवसायात स्विगी आणि झोमॅटोला टक्कर देण्यासाठी तयार झाले आहेत. याकरता बंगळुरूमध्ये पायलट प्रोजेक्टला देखील सुरूवात झाली आहे.  विविध रेस्टॉरंट्सबरोबर जोडण्यासाठी जेफ बेजोस यांनी इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्तींचे व्हेंचर असणाऱ्या कॅटामरानबरोबर सुद्धा हातमिळवणी केली आहे. (हे वाचा- नोकरदार वर्गासाठी खूशखबर! PF संदर्भात 5 मार्चला सरकार घेणार महत्त्वाचा निर्णय ) इकॉनॉमिक्स टाईम्सच्या अहवालानुसार अॅमेझॉनने फूड डिलीव्हरी  देण्यासाठी दोन तासांत डिलीव्हरी करणाऱ्या सप्लाय चेनची मदत घेण्यात येणार आहे. अ‍ॅमेझॉनने यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. अ‍ॅमेझॉन अशा वेळी अशा व्यवसायात प्रवेश करीत आहे जेव्हा स्विगी आणि झोमाटोने ग्राहकांसाठी मोठ्या प्रमाणात सूट कमी केली आहे. Uber Eats ने सुद्धा फूड डिलीव्हरी व्यवसायाला रामराम ठोकला आहे. त्यांनी आपला हा व्यवसाय झोमॅटोला विकला आहे. त्यामुळे अॅमेझॉन जर चांगल्या ऑफर्स घेऊन बाजारात येत असेल तर त्यांच्यासाठी ही गुंतवणूक फायद्याची ठरण्याची शक्यता आहे.अॅमेझॉन ही नवीन सेवा याच महिन्यात घेऊन येण्याची शक्यता आहे. अॅमेझॉन प्राईम वापरणाऱ्यांना ही सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या