JOIN US
मराठी बातम्या / मनी / इथे राहणारे लोक Dominos पिझ्झा खाऊ शकणार नाहीत, कंपनीने घेतला मोठा निर्णय

इथे राहणारे लोक Dominos पिझ्झा खाऊ शकणार नाहीत, कंपनीने घेतला मोठा निर्णय

जगभरात पिझ्झासाठी प्रसिद्ध असलेली डॉमिनोज पिझ्झा ही कंपनी आर्थिक संकटात आहे. आपला तोटा दिवसेंदिवस वाढतो आहे, असं या अमेरिकन कंपनीने म्हटलं आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 17 ऑक्टोबर : पिझ्झा म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर वेगवेगळ्या रंगांनी सजलेला Dominos पिझ्झा येतो पण जागतिक मंदीचा परिणाम मोठमोठ्या कंपन्यांवर दिसू लागला आहे. जगभरात पिझ्झासाठी प्रसिद्ध असलेली डॉमिनोज पिझ्झा ही कंपनी आर्थिक संकटात आहे. आपला तोटा दिवसेंदिवस वाढतो आहे, असं या अमेरिकन कंपनीने म्हटलं आहे. या कारणामुळेच ‘डॉमिनोज पिझ्झा’ कंपनीने 4 देशांत आपला कारभार गुंडाळण्याची तयारी केली केली आहे. भारतात डॉमिनोज चं फ्रँचायजी ज्युबिलंट फूडवर्क्स कडे आहे. स्वित्झर्लंड, आइसलँड, नॉर्वे, स्वीडन या चार देशांत कंपनी आपला कारभार बंद करणार आहे. या देशांमध्ये या कंपनीला तोटा सहन करावा लागतोय. भारतात मात्र डॉमिनोज पिझ्झा बंद होणार नाही. (हेही वाचा : PMC बँक घोटाळा : या पाचव्या आरोपीमुळे खातेदारांच्या ठेवींवर आली गदा) रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार डॉमिनोज चे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हिड वाइल्ड यांनी म्हटलं आहे, ज्या देशात जास्त तोटा होतोय तिथे आम्हाला कंपनी चालवणं कठीण बनलं आहे. सध्या डॉमिनोज पिझ्झाचा कारभार 85 देशांमध्ये आहे. या कंपनीचं मुख्यालय मिशिगनमध्ये आहे. 1960 मध्ये सुरू झालेल्या या कंपनीचा विस्तार पुढे अमेरिकेत सगळीकडे झाला. आता मात्र आर्थिक संकटामुळे या कंपनीला 4 देशांतला कारभार गुंडाळावा लागतोय. ================================================================================= VIDEO : रामदास आठवलेंनी वर्तवलं राज ठाकरेंचं भाकीत, म्हणाले…

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या