JOIN US
मराठी बातम्या / मनी / तीन दिवस बाकी; 31 ऑगस्टपर्यंत 'ही' कामं करुन घ्या, अन्यथा होऊ शकतं मोठं नुकसान

तीन दिवस बाकी; 31 ऑगस्टपर्यंत 'ही' कामं करुन घ्या, अन्यथा होऊ शकतं मोठं नुकसान

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे तुम्ही लाभार्थी असाल आणि तुम्ही अद्याप त्याचे KYC केले नसेल, तर ते लवकरात लवकर पूर्ण करा. सरकारने योजनेसाठी केवायसीची अंतिम मुदत 31 ऑगस्ट 2022 ठेवली आहे.

जाहिरात

Business Idea: ‘ही’ मशिन घेऊन रस्स्त्याच्या कडेला कुठेही बसा अन् दररोज कमवा 2000 रुपये, 10 हजारात सुरू होणार काम

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 28 ऑगस्ट : ऑगस्ट महिना संपत आला आहे. अशा स्थितीत हा महिना संपण्यापूर्वी काही महत्त्वाची आर्थिक कामे आहेत जी करणे अत्यंत आवश्यक आहे. असे न केल्यास तुम्हाला नंतर समस्यांना सामोरे जावे लागू शकते. जर तुम्ही पीएम किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी असाल तर त्याची केवायसी करण्याची अंतिम मुदत 31 ऑगस्ट रोजी संपणार आहे. यासोबतच PNB ने आपल्या खातेदारांना देखील एक महत्त्वाचं काम करावं लागणार आहे. पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांनी ई-केवायसी केले पाहिजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे तुम्ही लाभार्थी असाल आणि तुम्ही अद्याप त्याचे KYC केले नसेल, तर ते लवकरात लवकर पूर्ण करा. सरकारने योजनेसाठी केवायसीची अंतिम मुदत 31 ऑगस्ट 2022 ठेवली आहे. जर तुम्ही हे काम केले नाही तर तुम्हाला पुढील हप्त्याचा लाभ मिळणार नाही. सरकारने यापूर्वी केवायसी करण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2022 ठेवली होती, जी आता 31 ऑगस्ट 2022 पर्यंत वाढवण्यात आली आहे. या दिवसापूर्वी लोकांनी ही प्रक्रिया पूर्ण केली नसल्यामुळे त्यांना 11 व्या हप्त्याचा लाभ मिळालेला नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सरकार सप्टेंबर महिन्यात योजनेचा 12 वा हप्ता जाहीर करू शकते.   एक ना दोन कमी वयात श्रीमंत होण्याचे 5 मार्ग; वयाच्या तिशीतच व्हाल लखपती PNB ग्राहकांनी 31 ऑगस्टपूर्वी KYC करून घ्या तुम्ही पंजाब नॅशनल बँकेचे ग्राहक असाल तर 31 ऑगस्टपूर्वी तुमच्या खात्याचे KYC करा. अन्यथा बँक तुमचे खाते होल्डवर ठेवेल. आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून याबद्दल माहिती देताना बँकेने म्हटले आहे की ज्या ग्राहकांनी 31 मार्च 2022 पर्यंत त्यांच्या खात्याची KYC प्रक्रिया पूर्ण केली नाही, त्यांनी हे काम 31 ऑगस्ट 2022 पर्यंत करावे अन्यथा तुमचे खाते नंतर रोखले जाईल. Investment Tips: म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताय? मग ही बातमी एकदा वाचाच

ITR पडताळणी पूर्ण करा

जर तुम्ही 31 जुलै 2022 नंतर आयकर रिटर्न भरले असेल, तर तुम्ही त्याचे पडताळणीचे काम 1 महिन्याच्या आत म्हणजे 30 दिवसांत पूर्ण केले पाहिजे. आयकर विभागाने ही माहिती दिली आहे की, ज्यांनी 31 जुलैच्या अंतिम मुदतीनंतर आयटीआर भरला आहे, त्यांना त्याच्या पडताळणीसाठी फक्त 30 दिवसांचा अवधी मिळेल. जर तुम्ही तुमचे रिटर्न 1 ऑगस्टला भरले असेल, तर तुमच्या पडताळणीची अंतिम मुदत 31 ऑगस्ट रोजी संपत आहे. पडताळणीशिवाय, तुमचे आयटीआर रिटर्न पूर्ण मानले जाणार नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या