JOIN US
मराठी बातम्या / मनी / Diwali 2021 मध्ये तुमच्या जवळच्या व्यक्तींना काजू-बदाम किंवा मिठाई नाही तर द्या खास गिफ्ट! मिळेल आर्थिक सुरक्षा

Diwali 2021 मध्ये तुमच्या जवळच्या व्यक्तींना काजू-बदाम किंवा मिठाई नाही तर द्या खास गिफ्ट! मिळेल आर्थिक सुरक्षा

Diwali 2021 Gifts: ही आर्थिक उत्पादनं गिफ्ट केल्यानंतर त्यांच्या आर्थिक सुरक्षेसाठी तुम्ही मोठा हातभार लावू शकता. जाणून घ्या काय आहेत ही भन्नाट गिफ्ट्स!

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 29 ऑक्टोबर: दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर (Diwali 2021) येऊन ठेपला आहे. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात दिवाळीचा उत्साह पाहायला मिळणार आहे. भारतात आणि भारताबाहेरही दिवाळी हा सण धुमधडाक्यात साजरा केला जातो. लहान मुलांपासून थोरामोठ्यांपर्यंत या काळात सर्वांमध्ये उत्साह असतो. दरम्यान दरवर्षी येणाऱ्या या सणादरम्यान आपल्या नातलगांना काय गिफ्ट द्यायचं असा प्रश्न सतावतोच. दरवर्षी काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र अनेकदा काहीच न सूचल्याने मिठाई, ड्रायफ्रूट्स, कपडे इ. गोष्टी गिफ्ट म्हणून दिल्या जातात. पण आम्ही तुम्हाला काही अशा गिफ्ट आयडिया (Diwali Gift Idea) देणार आहोत ज्यामुळे तुमचे नातलग खूश तर होतीलच पण त्याचबरोबर त्यांना फायनान्शिअल सिक्योरिटी देखील मिळेल. ही आर्थिक उत्पादनं गिफ्ट केल्यानंतर त्यांच्या आर्थिक सुरक्षेसाठी तुम्ही मोठा हातभार लावू शकता. जाणून घ्या काय आहेत ही भन्नाट गिफ्ट्स! फिक्स्ड डिपॉझिट- गुंतवणूक करण्याचा हा जुना मार्ग असला तरी आजही अनेकांची पसंती एफडी करण्याला असते. तुम्ही देखील तुमच्या जवळच्या व्यक्तीच्या नावे FD उघडू शकता. वेगवेगळ्या कालावधीसाठी तुम्ही एफडीची सुविधा गिफ्ट करू शकता. हे वाचा- दिवाळीआधीच सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी, आज गोल्ड 8330 रुपयांनी स्वस्त लाइफ इन्शुरन्स- सध्याच्या धकाधकीच्या जीवनात Life Insurance हे आर्थिक प्रोडक्ट अत्यंत महत्त्वाचे आहे. तुम्ही एखादी लाइफ इन्शुरन्स पॉलिसी तुमच्या नातलगांना गिफ्ट करू शकता. LIC सारख्या नामांकित लाइफ इन्शुरन्स कंपनीत तुम्ही एखादी पॉलिसी सुरू करू शकता. हेल्थ इन्शुरन्स- कोरोना काळात हेल्थ इन्शुरन्स आवश्यक आहे. सध्याच्या काळात अशाप्रकारे आरोग्य विमा गिफ्ट करणं एक चांगला पर्याय ठरू शकतं. गोल्ड बाँड- या दिवाळीत तुम्ही तुमच्या कुटुंबीयांना फिजिकल गोल्ड गिफ्ट करण्याऐवजी गोल्ड बाँड गिफ्ट करू शकता. केंद्र सरकारकडून देखील सॉव्हरेन गोल्ड बाँड जारी केले जातात, ज्यात ऑनलाइन खरेदीवर तुम्हाला अतिरिक्त सूटही मिळेल. हे वाचा- Shaktikanta Das आणखी तीन वर्षासाठी RBI चे गव्हर्नर, मंत्रिमंडळाने दिली मंजुरी क्वालिटी शेअर- तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्याला ब्लू चिप कंपन्यांचे शेअर्सही भेट देऊ शकता. हे दर्जेदार शेअर्स दीर्घ मुदतीत चांगला परतावा देऊ शकतात. छोट्या बचत योजना- तुम्ही तुमच्या कुटुंबीयांसाठी गिफ्ट देताना पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजनांचा देखील पर्याय तपासू शकता. अशा अनेक योजना आहेत ज्यामुळे तुमच्या नातलगांचं भविष्य छोट्याशा गुंतवणुकीतून आर्थिकदृष्ट्या सुरक्षित होईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या