JOIN US
मराठी बातम्या / मनी / Diwali 2020: दिवाळीत सोनं-चांदी खरेदी करताय? मग असं ओळखा तुमचं सोनं शुद्ध आहे का

Diwali 2020: दिवाळीत सोनं-चांदी खरेदी करताय? मग असं ओळखा तुमचं सोनं शुद्ध आहे का

आज आम्ही तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासण्याच्या पद्धतींबद्दल सांगणार आहोत. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्सच्या (BSI ) मते सोन्याची शुद्धता तपासण्याचे चार प्रमुख मार्ग आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 13 नोव्हेंबर : दिवाळीत जर तुम्ही सोनं (Gold) आणि चांदी (Silver) खरेदी करण्याचा विचार करत असाल तर सोन्याच्या शुद्धतेबद्दल माहित असणं आवश्यक आहे. कारण बर्‍याच वेळा ग्राहक सोन्याची शुद्धता ओळखत नाहीत, यामुळे त्यांचे नुकसान होते. सोनं खरेदी करण्याआधी तुम्हाला 14 कॅरेट ते 24 कॅरेटपासून सोन्याची किंमत माहित असावी. आज आम्ही तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासण्याच्या पद्धतींबद्दल सांगणार आहोत. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्सच्या (BSI ) मते सोन्याची शुद्धता तपासण्याचे चार प्रमुख मार्ग आहेत. BSI करते हॉलमार्क BSI हॉलमार्क ही देशातील एकमेव एजन्सी आहे जी सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी हॉलमार्किंग करते. भारत सरकारच्या वतीने सोन्याची शुद्धता तपासण्याचे काम या एजन्सीमार्फत केले जाते. आजच्या काळात सर्व ज्वेलर्स हॉलमार्क केलेले दागिने विकत नाहीत. काहीजण स्वत: हॉलमार्किंग करतात, म्हणून खरेदी करण्यापूर्वी आपण खरेदी केलेल्या दागिन्यांमध्ये बीआयएस हॉलमार्क केलेला आहे की नाही ते पहा. वाचा- डिजिटल चोरांपासून सावधान! कोरोना काळात वाढले CYBER FRAUD, कसा कराल बचाव? बीएसआयच्या वेबसाइटनुसार हॉलमार्किंग तीन प्रकारे केले जाते- » 22K916: 22 कॅरेट सोन्यासाठी » 18K750: 18 कॅरेट सोन्यासाठी » 14K585: 14 कॅरेट सोन्यासाठी वाचा- धनत्रयोदशीच्या दिवशी या वस्तूंची करा खरेदी; होईल मोठा फायदा ! सोनं खरेदी करण्याआधी जाणून घ्या दर सोनं खरेदी करण्याआधी तुम्हाला दर माहित असणे गरजेचे आहे. यासाठी तुम्ही IBJA म्हणजेच इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशन वेबसाइट https://ibjarates.com/ वर भेट देऊन सध्याचे चालु दर शोधू शकता. या वेबसाइटवर दिलेल्या दरांमध्ये जीएसटीचा समावेश नसतात. वाचा- धनत्रयोदशीला काय आहे सोनेखरेदीचा मुहूर्त ते का करतात धनाची पूजा? वाचा एक क्लिकवर सोनं खरेदी केल्यानंतर बिल नक्की घ्या तसेच तुम्ही दागदागिने खरेदी करणार असाल तर नक्कीच बिल मागून घ्या. या बिलमध्ये सोन्याची शुद्धता आणि दर इत्यादींची माहिती ठेवली आहे. आपल्याकडे बिल नसल्यास आपण सोन्याची विक्री करू शकत नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या