नवी दिल्ली, 28 नोव्हेंबर: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा वापर मित्रमंडळी, ऑफिसमधले सहकारी, नातेवाईक आणि कुटुंबीयांशी कनेक्ट राहण्यासाठी केला जातो; पण अलीकडच्या काळात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स हे उत्पन्नाचं मोठं साधन बनलं आहे. ऑडिओ, व्हिडिओ, टेक्स्ट आदी स्वरूपात कंटेंट निर्मिती करून कमाई करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. अमेरिकेतला एक युवक सोशल मीडियाकडे आकर्षित झाला. या माध्यमातून त्याने बिझनेस सुरू केला. यासाठी त्याने शिक्षण अर्धवट सोडलं. अल्पवधीतच या युवकाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर विस्तारला आहे. अनेक मोठ्या कंपन्या त्याच्या क्लायंट आहेत. या युवकाने सोशल मीडियाच्या माध्यमातून बिझनेस करून सुमारे 25 कोटी रुपयांची संपत्ती मिळवली आहे. काही वर्षांपूर्वी काहीसा निराश असणारा हा युवक आता अतिशय आरामदायी जीवन जगत आहे. या युवकाने सोशल मीडियावर असा कोणता बिझनेस केला केला, ज्यामुळे त्याला एवढं यश मिळलं, त्याविषयी जाणून घेऊ या. विद्यार्थी ते यशस्वी बिझनेसमन अमेरिकेत टेक्सास येथे राहणारा चेस चॅपेल हा एक यशस्वी बिझनेसमन आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून बिझनेस करून तो श्रीमंत झाला आहे. जगभरातल्या अनेक नामवंत कंपन्या त्याच्या क्लायंट आहेत. काही वर्षांपूर्वी अशक्त आणि निराश असलेला चेस आता अतिशय लक्झरी जीवन जगत आहे. त्याची ही वाटचाल नक्कीच सोपी नव्हती. श्रीमंत होण्यासाठी त्याने शिक्षण अर्धवट सोडलं. सोशल मीडियाचा अत्यंत हुशारीने वापर करून आपला बिझनेस वाढवला आणि त्यात तो यशस्वी झाला. शिक्षण अर्धवट सोडलं 23 वर्षांच्या चेसने आपलं शिक्षण अर्धवट सोडलं. शाळेतल्या श्रीमंत मित्रांचा त्याला खूप हेवा वाटत होता. 15 वर्षांचा असताना त्याने शाळा सोडली. शिक्षणाचा कालावधी त्याने बिझनेस मॅनेजमेंट आणि आंत्रप्रीनरशिप अॅकेडमीत पैसे कमवण्याच्या प्रयत्नात घालवला. हेही वाचा : वय कमी करण्यासाठी ‘हा’ उद्योगपती करतोय लाखो रुपये खर्च; आतापर्यंत 5 वर्ष वय कमी केल्याचा दावा सोशल मीडियावरील पकड मजबूत केली चेसने सुरुवातीच्या काळात सोशल मीडिया मार्केटिंगवर आपली पकड मजबूत केली. त्याने टिकटॉक आणि फेसबुकवर वेगवेगळ्या कंपन्यांच्या जाहिराती प्रसिद्ध करण्याचं काम सुरू केलं. यात सेव्हन इलेव्हन, पॉवर क्रंच, माइक रयान आणि वॉरन जीसारख्या कलाकरांची नावंदेखील समाविष्ट होती. `मी 15व्या वर्षी दरमहा सुमारे 8 लाख रुपये कमावत होतो. मी तेव्हा शिक्षणाच्या विरोधात नव्हतो. जेव्हा तुम्ही कमी वयात एवढे पैसे कमवू लागता, तेव्हा यामुळे तुमच्या मनावर एक प्रकारे दुष्परिणाम होऊ लागतो. अशा वेळी जेव्हा तुम्ही तुमचे प्लॅन आखून विचारपूर्वक वाटचाल कराल तेव्हा काही गोष्टी नक्कीच शक्य होतील, असं तुम्हाला वाटू लागतं,` असं चेसनं सांगितलं. हेही वाचा : #कायद्याचंबोला : लांबच्या कोर्टात खेट्या घालून दमलात? केस कशी ट्रान्सफर करायची? `शिक्षण न घेता शाळा अर्धवट सोडल्याने मला माझे शिक्षक आणि मित्र वेडा समजत होते. शाळा सोडल्यानंतर मी माझं सर्व लक्ष बिझनेसवर केंद्रित केलं. कोणत्याही गोष्टीमुळे विचलित न होता पुढे वाटचाल करत राहिलो. तेव्हा एन्फ्लुएन्सर हा शब्द नव्याने प्रचलित झाला होता. मार्केटमधली तेजी पाहून मी फेसबुक अॅडव्हर्ट्समध्ये शिरलो. मी कंपनीत माझं स्वतःचं स्थान निर्माण केलं,` असं चेसनं सांगितलं. व्यवसायाचा वेगाने विस्तार चेसचा बिझेनस वेगाने विस्तारत गेला. लवकरच तो एका वर्षापेक्षा जास्त कालवधीसाठी बुक झाला. त्याचे असे अनेक क्लायंट्स आहेत, जे दीर्घ काळापासून त्याची सर्व्हिस वापरतात आणि त्याच्याशी जोडले गेले आहेत. `मला नेहमी आयुष्य माझ्याच पद्धतीने जगायचं होतं. मी कायम महत्त्वाकांक्षी राहिलो आहे. जेव्हा इतर वर्गमित्रांना फायरमन, पोलीस अधिकारी किंवा डॉक्टर व्हायचं होतं तेव्हा मला वर्ल्ड ट्रॅव्हलर व्हायचंय, असं मी म्हणालो होतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रीमंत बनता येतं, यात अजिबात शंका नाही,` असं चेसने सांगितलं.