मुंबई : आजकाल ऑनलाइन पेमेंटमुळे कार्ड वापरण्याचं प्रमाण कमी झालं आहे. मात्र अजूनही क्रेडिट कार्डचा वापर सुरू आहे. काही ठिकाणी अजूनही डेबिट कार्ड वापरलं जातं. आपण गडबडीत असून तर पर्स विसरतो किंवा काहीवेळा प्रवासात आपली पर्स किंवा पाकिट चोरीला जातं. अशावेळी त्यामध्ये महत्त्वाची कागदपत्र असतात. डेबिट आणि क्रेडिट कार्ड असतात. पोलीस स्टेशनला जाईपर्यंत उशीर होतो. तुमचं कार्ड हरवलं किंवा चोरीला गेलं तर सगळ्यात आधी कोणत्या गोष्टी करायच्या याबाबत बँक ऑफ महाराष्ट्रने माहिती दिली आहे. तुम्ही कार्ड हरवता किंवा चोरीला जातं म्हणजे तुमचे पैसेही जातात असं बँकेनं म्हटलं आहे. कार्ड जर चोरीला गेलं किंवा हरवलं तर काय करायचं याबाबत बँकेनं महत्त्वाची माहिती दिली आहे. सगळ्यात पहिल्यांदा तुमचं ज्या बँकेत खातं आहे तिथल्या ब्रांचमध्ये याची माहिती द्या. तुमच्याकडे त्या बँकेचा नंबर असेल तर फोन करून तातडीने माहिती द्या आणि कार्ड ब्लॉक करायला सांगा.
महाराष्ट्र बँकेची महाबँक युवा योजना तुम्हाला माहिती आहे का?तातडीने तुमच्या ऑनलाइन बँकिंगचे पासवर्ड बदला. यामुळे तुमचं कार्ड हॅक करू शकणार नाहीत. तुमच्या खात्यावरून पैसे जात नाहीत ना याची काळजी घ्या. त्यानंतर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल करा. त्याची NOC जपून ठेवा. त्याची तुम्हाला बँकेत मदत होऊ शकते.
या चुका टाळा तुमचं कार्ड हरवल्यावर किंवा चोरीला गेल्यावर गुगलवरून फोननंबर शोधून बँकेला फोन करू नका. यामुळे फ्रॉडमध्ये अडकण्याची शक्यता असते. त्यामुळे ही चूक करू नका. दुसरं महत्त्वाचं तुमच्या बँकेचे डिटेल्स कोणालाही फोनवर किंवा SMS, चॅटवर शेअर करू नका.
Money Mantra - तुम्ही घोटाळ्यात अडकण्याची शक्यता; आर्थिक व्यवहाराआधी आजचं राशिभविष्य जरूर वाचाअनोळखी नंबरवरून जर फोन आला तर त्याला कोणतीही माहिती देऊ नका. OTP सांगू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याने दिलेल्या कोणत्या लिंक किंवा App वर क्लीक करू नका. त्यामुळे तुमचं बँक खातं रिकामं होऊ शकतं.
आपले डेबिट कार्ड हरवले आहे याची आपल्याला खात्री असल्यास आपण आपल्या पैशाचे संरक्षण करण्यासाठी लवकर कारवाई करणे आवश्यक आहे. जेव्हा असं काही होतं तेव्हा आपण आपले पैसे सुरक्षित करण्यासाठी तातडीनं ही महत्त्वाची पावलं उचलणं आवश्यक आहे. त्यामुळे गोंधळून कोणतीही चूक करू नका.