क्रेडिट स्कोअर कॅल्क्युलेशन
Credit Score Calculation: तुम्ही कधी लोन किंवा क्रेडिट कार्ड घेतलं असेल तर तुम्हालाही क्रेडिट स्कोअरविषयी माहिती असेलच. तुम्ही कोणतंही लोन घेण्यासाठी गेलात किंवा क्रेडिट कार्ड घेण्यासाठी गेलात. या ठिकाणी या स्कोअरची खूप गरज असते. याला सिबिल स्कोअर असंही म्हणतात. चांगला क्रेडिट स्कोअर असेल तर लोन घेताना फायदा होतो. पर्सनल लोन असो किंवा क्रेडिट कार्ड किंवा मग होम लोन. प्रत्येक ठिकाणी बँक किंवा फायने्स कंपनी सिबिल किंवा क्रेडिट स्कोअर व्हेरिफाय करते. अशा वेळी क्रेडिट स्कोअर का असतो आणि तो कसा कॅल्क्युलेट केला जातो हे जाणून घेणं गरजेचं आहे. अशा प्रकारे स्कोअर तयार केला जातो TransUnion CIBIL सारखे क्रेडिट ब्युरो बँकांसह इतर फायनेंशियल इंस्टीट्यूशनकडून तुमच्या कर्जाचे आणि क्रेडिट कार्डच्या व्यवहारांचे डिटेल्स गोळा करतात. या माहितीच्या आधारे क्रेडिट रिपोर्ट आणि CIBIL स्कोर तयार केला जातो. कर्जासाठी अर्ज करताना, बँका तुमचा क्रेडिट रिपोर्ट आणि क्रेडिट ब्युरोकडून स्कोअर विचारतात. याद्वारे, तुम्ही कर्जाची परतफेड करू शकता की नाही हे बँक मूल्यांकन करते. सोप्या शब्दात, ते बँकेला तुमच्या आर्थिक पतपात्रतेविषयी माहिती देते. किती सॅलरी असल्यावर खरेदी करावं घर? काय आहे फॉर्मूला? वाचा सविस्तर असा समजून घ्या क्रेडिट स्कोर क्रेडिट स्कोअर 300 ते 900 पर्यंत असतो. तुमचा क्रेडिट स्कोअर 900 च्या जितका जवळ असेल, तितकी तुमची कर्ज मंजूरीची शक्यता जास्त असते. साधारणपणे 750 च्या वर क्रेडिट स्कोअर चांगला मानला जातो. 550 आणि 750 मधील स्कोअर चांगला मानला जातो, म्हणजे सरासरी, तर 550 पेक्षा कमी स्कोअर खराब मानला जातो. म्हणजेच हा कमी क्रेडिट स्कोअर असतो. क्रेडिट स्कोअर खराब असल्यास बँका कर्ज देण्यास नकार देऊ शकतात किंवा जास्त व्याजदर आकारू शकतात. क्रेडिट स्कोअर व्यतिरिक्त, इतर अनेक घटक आहेत ज्याचा कर्जावर परिणाम होतो. Home Loan Benefits: लोन घेऊन घर खरेदी करणं चुकीचं नाही! हे आहेत 4 फायदे, ज्याचा तुम्ही विचारही केला नसेल या घटकांवर होतो परिणाम CIBIL स्कोअरचं कॅल्क्युलेशन अनेक फॅक्टर्सवर अवलंबून असतं. जसं की, तुमच्या रीपेमेंटची हिस्ट्री कशी आहे? म्हणजे तुम्ही वेळेवर ईएमआय किंवा क्रेडिट कार्ड बिल भरले की नाही. दुसरे म्हणजे क्रेडिट युटिलायझेशन. क्रेडिट युटिलायझेशन म्हणजे तुम्ही क्रेडिट कार्ड लिमिट किती वापरता. तुम्ही जितके जास्त क्रेडिट कार्ड वापराल तितके क्रेडिट युटिलायझेशन रेशो (CUR) जास्त. यावरुन दिसतं की तुमचे क्रेडिट हंगरी बिहेवियर आणि खर्चावर तुमचे नियंत्रण नाही. क्रेडिट यूटिलायजेशन खूप जास्त असण्याचा परिणाम क्रेडि स्कोअरवर पडतो. लोन घेण्यासाठी खूप जास्त इन्क्वायरी किंवा अर्ज केल्यावरही सिबिल स्कोअरवर परिणाम होतो.