JOIN US
मराठी बातम्या / मनी / PMC बँकेच्या कारवाईनंतर या 9 बँका बंद होणार का? RBI ने केला खुलासा

PMC बँकेच्या कारवाईनंतर या 9 बँका बंद होणार का? RBI ने केला खुलासा

देशातल्या 9 सरकारी बँका बंद होण्याची जोरदार चर्चा आहे. सोशल मीडियावरही याबद्दल उलटसुलट माहिती येतेय पण आता RBI ने याबदद्ल खुलासा केला आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 25 सप्टेंबर : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पंजाब महाराष्ट्र सहकारी बँकेवर (Punjab and Maharashtra Cooperative Bank) निर्बंध लादले आहेत. RBIच्या या निर्णयामुळे बँकेचे सर्व व्यवहार बंद करण्यात आले आहेत. त्याचबरोबर राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी शरद पवार, अजित पवार यांच्यासह 70 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सगळ्या घडामोडींमध्ये 9 सरकारी बँका बंद होण्याची जोरदार चर्चा आहे. सोशल मीडियावरही याबद्दल उलटसुलट माहिती येतेय पण आता RBI ने मात्र या अफवा असल्याचं म्हटलं आहे. देशातली कोणतीही व्यावसायिक बँक बंद होणार नाही, असं रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केलं. या अफवांवर ग्राहकांनी लक्ष देऊ नये, त्यांचे पैसे बँक खात्यांमध्ये पूर्णपणे सुरक्षित आहेत, असंही RBI चं म्हणणं आहे. ‘मी स्वत:हून EDच्या कार्यालयात जाणार, माहिती हवी असेल तर देऊन येतो’ कॉर्पोरेशन बँक, IDBI बँक, यूको बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, आंध्रा बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, देना बँक आणि युनायटेड बँक या बँका बंद होणार, अशा बातम्या सोशल मीडियाद्वारे पसरवल्या जात आहेत. अर्थसचिव राजीव कुमार यांनी ट्विटरवरून या बातम्या खोट्या असल्याचं म्हटलं आहे. सरकारी बँकांना निधीचा पुरवठा करून सुधारणा केल्या जातील, असंही त्यांनी म्हटलं आहे. याआधी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 10 सरकारी बँकांच्या विलिनीकरणाची घोषणा केली होती. सरकारच्या या निर्णयामुळे सध्या अस्तित्वात असलेल्या 27 बँकांपैकी 12 बँका राहणार आहेत. ============================================================================= VIDEO: आज दिवसभरात घडाणाऱ्या सगळ्यात महत्त्वाच्या टॉप 18 न्यूज, पाहा झटपट

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या