JOIN US
मराठी बातम्या / मनी / खूशखबर! कंपन्यांमध्ये सुरू झाली पगारवाढ, लॉकडाऊन काळात 'या' क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना दिलासा

खूशखबर! कंपन्यांमध्ये सुरू झाली पगारवाढ, लॉकडाऊन काळात 'या' क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना दिलासा

लॉकडाऊन काळात विविध कंपन्यातील कर्मचाऱ्यांना मोठा फटका बसला. काहींनी नोकरी गमावली तर काहींची पगारकपात झाली. मात्र हळूहळू ही परिस्थिती बदलू लागली आहे.

जाहिरात

31 मार्च 2020 पर्यंत 2000 रुपयांच्या 27,398 लाख नोटा वापरात होत्या. तर मार्च 2019 मध्ये 32,910 लाख नोटा वापरात होत्या. 2018च्या डिसेंबर महिन्यात 2,000च्या नोटांची संख्या 33,632 लाख एवढी होती.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 08 जुलै : कोरोना व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे देशातील अनेक कंपन्यांचे व्यवहार ठप्प झाले होते. कर्मचाऱ्यांना देखील याचा मोठा फटका बसला होता. अनेक कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांचे अप्रेजल (Appraisal) कोरोनाच्या या संकटकाळात थांबवण्यात आले होते. काही कंपन्यांनी तर त्यांच्या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले होते, तर काहींनी पगारकपात केली होती. मात्र आता ही परिस्थिती बदलू लागली आहे. काही बँका आणि ऑटो इंडस्टीमधील (Bank & Auto Industries) कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांची पगारवाढ करण्यास सुरूवात केली आहे. HDFC, Axis आणि ICICI बँक देत आहेत बोनस एचडीएफसी बँकेने त्यांच्या कर्मचाऱ्यांचे इनक्रिमेंट केले आहे. ही बँक त्यांच्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यामध्ये सध्या अग्रेसर आहे. Axis बँकेने देखील त्यांच्या 80 टक्के कर्मचाऱ्यांना बोनस देण्याची घोषणा केली आहे. (हे वाचा- Gold Price Today : सोन्याचांदीला झळाळी कायम, वाचा काय आहेत बुधवारचे दर ) त्याचप्रमाणे आयसीआयसी बँक देखील त्यांच्या 80 हजार कर्मचाऱ्यांचा पगार 8 टक्क्यांनी वाढवणार आहे. इतर बँका देखील याच मार्गावर चालण्याची शक्यता आहे. ऑटोमोबाइल कंपन्या देखील करत आहेत पगारवाढ केवळ बँका नाहीत, तर कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ऑटो कंपन्या देखील कर्मचाऱ्यांचा बोनस आणि इनक्रिमेंटची तयारी करत आहेत. Kia आणि एमजी मोटरने याआधीच व्हॅरिएबल पे आणि इतर इंसेटिव्ह दिले आहेत. महिंद्रा अँड महिंद्रा, हिरो मोटो कॉर्प, अशोक लेलँड, टीव्हीएस मोटर, टोयोटा किर्लोस्कर आणि टाटा मोटर्स देखील त्यांच्या कर्मचाऱ्यांना पगारवाढ देणार आहे. मारूती सुझुकी तर पुढील महिन्यात म्हणजेच ऑगस्टमध्ये कर्मचाऱ्यांची पगारवाढ करणार आहे. दरम्यान यावर्षी होणारी पगारवाढ ही गेल्या वर्षीच्या तुलनेत काही प्रमाणात कमी असेल. (हे वाचा- उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना फ्री LPG सिलेंडर,मोदी सरकारचा महत्त्वाचा निर्णय)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या