मुंबई 13 फेब्रुवारी : अर्थसंकल्प म्हटला की सगळ्यांचे डोळे लागतात ते CNBC-TV18कडे. गेली 20 वर्ष या चॅनलने सर्वांना मागे टाकत अव्वल स्थान मिळवलं आहे. अर्थविषयक बातम्या आणि विश्लेषणासाठीच्या या चॅनलने आपली वेगळी ओळख निर्माण केलीय. ताज्या आणि अचूक बातम्या, सखोल विश्लेषण, नामांकित पाहुणे आणि एक्सक्लुझीव्ह माहिती यामुळे CNBC-TV18ने आपला दबदबा निर्माण केलाय. 2020च्या अर्थसंकल्पाच्या दिवशी आणि सर्व आठवडावर CNBC-TV18ने TRPमध्ये सगळ्या इंग्रजी चॅनल्सला मागे टाकलंय. BARC India ने जाहीर केलेल्या आकड्यांमध्ये ही बाब स्पष्ट झालीय. देशव्यापी प्रेक्षकसंख्येत CNBC-TV18चा वाटा तब्बल 75.1 टक्के एवढा होता. अर्थसंकल्पाच्या दिवशी सर्व इंग्रजी न्यूज चॅनल्सची जेवढी प्रेक्षकसंख्या होती त्यापेक्षा जास्त प्रेक्षकसंख्या फक्त CNBC-TV18ला मिळाली होती. अर्थविषयाला वाहिलेल्या एखाद्या चॅनलने न्यूज चॅन्सलाही मागे टाकणं ही सर्वात मोठी गोष्ट समजली जाते. याच काळात देशात राजकीय घडामोडींना वेग आला होता. राजकीय बातम्यांचं वर्जस्व असतानाही CNBC-TV18ने आपल्या गुणवत्तेने प्रेक्षकांना आपल्याकडे खेचून घेतलं. याच दिवशी अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी पहिली मुलाखतही CNBC-TV18लाच दिली होती. देशातल्या 3 बड्या इन्शुरन्स कंपन्यांचं विलिनीकरण, ग्राहकांवर काय होणार परिणाम? मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. मुंबईत मुख्यालय असलेल्या या चॅनलनची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वाधिक दखल घेतली जाते. अर्थविषय बातम्या म्हणजे क्लिष्ट आणि कंटाळवाणी गोष्ट असते अशी समज एकेकाळी होती. CNBC-TV18ने ही समज खोटी ठरवत अतिशय सोप्या, सामान्य माणसाला कळेल अशा आणि रंजक पद्धतीने सर्व बाजू मांडत प्रेक्षकांची अभिरुची वाढवण्याचं काम केलंय. हेही वाचा…