मुंबई, 9 ऑगस्ट : देशात स्वस्त चायनीज मोबाईलची क्रेझ वाढली असल्याने देशी मोबाईल कंपन्यांना चांगलाच फटका बसत आहे. कमी वेळेत चायनीज कंपन्यांना आपलं वर्चस्व या क्षेत्रात प्रस्थापित केलं. स्वत आणि चांगले फीचर्स मोबाईलमुळे ग्राहकही त्यांच्याकडे सर्वाधिक आकर्षित होतात. मात्र आता भारत सरकार अशा चिनी कंपन्यांना दणका देण्याची तयारी करत आहे. देशांतर्गत कंपन्यांना समर्थन देण्यासाठी आणि स्वस्त चिनी मोबाईल कंपन्यांना धक्का देण्यासाठी, 150 किंवा 12000 त्यापेक्षा कमी किंमतीच्या चायनीज मोबाईल फोनवर बंदी घातली जाऊ शकते. लाईव्ह हिंदुस्थान वेबसाईटने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. चिनी ब्रँडमुळे देशांतर्गत कंपन्यांना फटका रॉयटर्सच्या बातमीनुसार, हे पाऊल Xiaomi सारख्या चिनी कंपन्यांसाठी मोठा झटका ठरू शकतो. चीनी ब्रँड्समुळे देशांतर्गत स्मार्टफोन निर्मात्यांमध्ये लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळे सरकारला हे पाऊल उचलावे लागले आहे. Multibagger Stock: 15 रुपयांचा स्टॉक 3000 रुपयांवर, गुंतवणूकदारांना मालामाल करणारा ‘हा’ शेअर तुम्हाला माहित आहे का? जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी मोबाइल बाजारपेठ असलेल्या भारतातील पारंपारिक उपकरणांपासून दूर जाणाऱ्या वापरकर्त्यांमध्ये लोकप्रिय असलेल्या एन्ट्री-लेव्हल स्मार्टफोनचा मोठा हिस्सा चीनी कंपन्यांकडे आहे. लावा आणि मायक्रोमॅक्स सारख्या भारतीय कंपन्यांनी एक दशकभरापूर्वी त्वरीत लोकप्रियता मिळवली. परंतु त्यानंतर चिनी कंपन्यांच्या तीव्र स्पर्धेमुळे त्यांनी बाजारपेठेतील हिस्सा गमावला. सरकारकडून विवाहित जोडप्यांना मिळतात 72000 रुपये, तुम्हीही घेऊ शकता लाभ काही कंपन्यांची चौकशी सुरु भारत आधीच देशात पाय रोवलेल्या Xiaomi, Oppo आणि Vivo सारख्या चिनी कंपन्यांची चौकशी करत आहे. या कंपन्यांवर करचोरी आणि मनी लाँड्रिंगचे आरोप आहेत. सरकारने यापूर्वी Huawei Technologies Co आणि ZTE Corp दूरसंचार उपकरणांवर बंदी घालण्यासाठी अनधिकृत माध्यमांचा वापर केला आहे.