JOIN US
मराठी बातम्या / मनी / Cheque Payment करण्याआधी हा नियम वाचा, नाहीतर तुमचं होईल मोठं नुकसान

Cheque Payment करण्याआधी हा नियम वाचा, नाहीतर तुमचं होईल मोठं नुकसान

कडक नियम असूनही फसवणूक करणारे काही ना काही मार्ग शोधून काढतातच. हे लक्षात घेऊन पंजाब नॅशनल बँकेने मोठे पाऊल उचलले आहे.

जाहिरात

बँक चेक पेमेंट

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 9 मार्च: पंजाब नॅशनल बँक (PNB) ने 5 लाख रुपयांपेक्षा जास्त चेक पेमेंटसाठी पॉझिटिव्ह पे सिस्टम (PPS) अनिवार्य केली आहे. यामुळे ग्राहकांना फसवणुकीपासून वाचवण्यात मदत होईल. चेक पेमेंटचा हा नवा नियम पुढील महिन्याच्या 5 तारखेपासून लागू होणार आहे. यापूर्वी, Positive Pay System अंतर्गत, मर्यादा 10 लाख रुपये आणि त्याहून अधिक होती. जाणून घ्या हे बदल काय आणि याचा वापर आपण कसा करु शकतो.

पॉझिटिव्ह पे सिस्टम काय?

PPS ही नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) द्वारे तयार केलेली एक यंत्रणा आहे. ज्यासाठी बँक ग्राहकांनी त्यांचे बचत खाते असलेल्या बँकेला त्यांच्याद्वारे जारी केलेल्या चेकची माहिती द्यावी लागते. चेक क्लिअरन्ससाठी सादर करण्यापूर्वी ही माहिती शेअर करणे आवश्यक आहे. चेकची माहिती अनेक प्रकारे सादर केली जाऊ शकते.

तुमचं पॅन आधारशी लिंक आहे की नाही? विसरला असाल तर असं करा चेक

PNB चेकसाठी PPS चा लाभ कसा मिळवायचा?

ब्रांच ऑफिस, ऑनलाइन बँकिंग, मोबाइल बँकिंग (PNB ONE), किंवा एसएमएस बँकिंगद्वारे चेकची माहिती देऊन पॉझिटिव्ह पे सिस्टमचा वापर केला जाऊ शकतो. या संदर्भात, पीएनबीने म्हटले आहे की चेक सादर करण्याच्या तारखेच्या एक दिवस आधी माहिती द्यावी लागेल.

अवघ्या 5 मिनिटात मिळेल होम लोन; एकदा प्रयत्न तर करून पाहा, ही आहे प्रक्रिया!

संबंधित बातम्या

PPS अंतर्गत व्हेरिफिकेशनसाठी कशी शेअर करावी चेकची माहिती?

-पीएनबी नेट बँकिंगमध्ये लॉग इन करा. -व्हॅल्यू अ‍ॅडेड सर्व्हिसेज अंतर्गत ‘पॉझिटिव्ह पे सिस्टम’ टॅबवर क्लिक करा. -ड्रॉप-डाउन मेनूमधून अकाउंट नंबर निवडा. यानंतर ग्राहकाला सहा अंकी चेक नंबर, चेक अल्फा (3 कॅरेक्टर), चेकची तारीख, चेकची रक्कम आणि -लाभार्थीचे नाव सादर करावे लागेल. -ट्रांझेक्शनसाठी पासवर्ड एंटर करा आणि सबमिट टॅबवर क्लिक करा.

चेकचे डिटेल्स SMS द्वारे कसे पाठवायचे?

-अकाउंट नंबर: फुल अकाउंट नंबर -चेक नंबर: 6 अंकांचा चेक नंबर -चेक अल्फा: चेकवर जे 3 अक्षरं छापलेले असतात -चेक किंमत : -चेक की तारीख: DDMMYYYY -ही प्रोसेस पूर्ण झाल्यावर, ग्राहकाला एक मेसेज मिळेल, ‘अकाउंट नंबर XXXXXXXXXXXXXXX मधील चेक नंबर XXXXXX च्या PPS डेटासाठी तुमची रिक्वेस्ट स्वीकारण्यात आली आहे.’

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या