चेक बाऊन्सच्या प्रकरणांमध्ये लोन डिफॉल्टचे नियम तयार केले जात आहेत.
चेक बाऊन्सच्या प्रकरणांमध्ये लोन डिफॉल्टचे नियम तयार केले जात आहेत. इतर खात्यातून पैसे वसूल करण्याबरोबरच कठोर कारवाई करण्याची तयारी सुरू आहे. तुमचा जारी केलेला चेक बाऊन्स झाला त्यामुळे तो केवळ तुमच्या इतर खात्यातून वसूल केला जाऊ शकतो. तसंच, तुमचा CIBIL स्कोअर देखील खराब होऊ शकतो. चेक बाऊन्सिंग प्रकरणांना कठोरपणे हाताळण्यासाठी Standered Operation Procedure तयार करण्यासाठी वित्त मंत्रालयात एक महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट कायद्यातील दुरुस्तीवरही चर्चा झाली. सीएनबीसी आवाजने ही माहिती दिली आहे.
चेक बाऊन्स प्रकरणांमध्ये लोन डिफॉल्ट नियम लागू होऊ शकतात. याशिवाय अन्य खात्यांमधून पैसे वसूल करण्याबरोबरच कठोर कारवाई करण्याची तयारी सरकार करत आहे. HDFC ने सुरु केला लाइफ इन्कम इन्शुरन्स प्लॅन, रिटर्नसोबत मिळेल टॅक्स बेनिफट
अशा वेळी कंपनी किंवा व्यक्तीचा क्रेडिट स्कोअरही कमी होईल. Defaulters ना इतर बँकांमध्ये खाती उघडण्यास बंदी घातली जाऊ शकते. पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत लवकर वाढेल पैसा! मिळेल 50 लाखांच्या सम एश्योर्डसह लोनची सुविधा
गेल्या आठवड्यात अर्थ मंत्रालयसोबत बँका आणि आरबीआयची बैठक झाली. निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट कायद्यातील बदल आणि एसओपी तयार करण्यावर चर्चा करण्यात आली.
कायद्याला गुन्हेगारीमुक्त करण्यासाठी सध्याच्या कायद्यात दुरुस्ती केली जाऊ शकते. Cheque Dishonour प्रकरणी 2 वर्षांच्या तुरुंगवासाची तरतूद काढून टाकली जाईल.