JOIN US
मराठी बातम्या / मनी / 7th Pay Commission: या केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! Appraisal फॉर्म भरण्याची तारीख वाढवली

7th Pay Commission: या केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! Appraisal फॉर्म भरण्याची तारीख वाढवली

DOPT ने या केंद्रीय कर्मंचाऱ्यांसाठी अप्रेजल फॉर्म जमा करण्याची डेडलाइन वाढवली आहे.

जाहिरात

काही गोष्टी नव्याने सुरु करा. दोघांपैकी एकाने नोकरी गमावली तर, घराच्या बजेटमध्ये नक्कीच अडचण येऊ शकते. आपल्या येणाऱ्या पगाराप्रमाणे आपण आपले खर्च ठरवत असतो. घराचे हप्ते, काही प्लॅनिंग खराब होतात पण, या नकारात्मक परिस्थितीतही शांत राहा.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 20 मे: केंद्र सरकारच्या (Central Government) कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने आर्थिक वर्ष 2020-21 साठी सेंट्रल सेक्रिटेरिएट सर्व्हिस (CSS), सेंट्रल सेक्रिटेरिएट स्टेनोग्राफर्स सर्व्हिस (CSSS) आणि सेंट्रल सेक्रिटेरिएट क्लर्कियल सर्व्हिस (CSCS) कॅडरच्या ग्रुप A, B आणि ग्रुप C साठीच्या केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी अप्रेजल फॉर्म  (Appraisal form) जमा करण्याची तारीख वाढवली आहे. डिपार्टमेंट ऑफ पर्सनेल अँड ट्रेनिंगने एक प्रेस रीलिज जारी करत याबाबत माहिती दिली आहे. यामध्ये दिलेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरस पँडेमिकमुळे (Coronavirus Pandemic) या कॅडेर्सचे ग्रुप A, B आणि ग्रुप C च्या कर्मचाऱ्यांसाठी अप्रेजलची तारीख वाढवण्यात आली आहे. या प्रेस रीलीजमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार अप्रेजल अर्थात पगारवाढीची सर्व कामं 31 डिसेंबर 2021 पर्यंत पूर्ण केली जातील. अप्रेजलची नवीन डेडलाइन सर्व सध्याचे कर्मचारी आणि 28 फेब्रुवारी 2021 नंतर निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना लागू होईल. सातव्या वेतन आयोगातील शिफारशीनुसारच केंद्रीय कर्मचाऱ्यांना पगार मिळत आहे. याअंतर्गत कर्मचाऱ्यांचा DA जून 2021 मध्ये वाढू शकतो. हे वाचा- लहान मुलांसाठी LIC ची खास योजना, शिक्षणासाठी राहणार नाही पैशाचं टेन्शन! नवीन तारखांनुसार सेंट्रल सेक्रिटेरिएट सर्व्हिस**,** सेंट्रल सेक्रिटेरिएट स्टेनोग्राफर्स सर्व्हिस आणि सेंट्रल सेक्रिटेरिएट क्लर्कियल सर्व्हिस कॅडरच्या ग्रुप A, B आणि ग्रुप C च्या कर्मचाऱ्यांसाठी अप्रेजल फॉर्म 31 मे पर्यंत मिळणार आहे. दरम्यान सेल्फ अप्रेजल फॉर्म 30 जून 2021 पर्यंत जमा करावा लागेल. रिपोर्टिंग ऑफिसर हा फॉर्म पडताळून पाहून तो रिव्ह्यूइंग ऑफिसरकडे 31 जुलैपूर्वी पाठवतील. महागाई भत्त्याबाबत केंद्र सरकार करणार महत्त्वाची घोषणा केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सातव्या वेतन आयोगाअंतर्गत मिळणारा महागाई भत्ता जानेवारीपासून थांबला आहे. दरम्यान कर्मचाऱ्यांना याकरता आता जास्त वाट पाहावी लागणार नाही, अशी शक्यता आहे. केंद्र सरकार जूनमध्येच DA मध्ये वाढीची घोषणा करू शकते. नॅशनल काउंसिल-JCM-स्टाफ साइडने याबाबत माहिती दिली आहे. महागाई भत्ता वाढल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात साधारण 4 टक्क्याने वाढ होऊ शकते. JCM-स्टाफ साइड सेक्रेटरी शिवा गोपाल मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सरकार जूनमध्ये महागाई भत्त्यातील वाढीची घोषणा करू शकते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या