नवी दिल्ली, 07 एप्रिल : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) रेपो दरात कपात केल्यानंतर अनेक खाजगी बँकांनी देखील त्यांच्या व्याजदरांमध्ये कपात केली आहे. आता सोमवारी सरकारी बँक असणाऱ्या कॅनरा बँकेने (Canara Bank) रेपो लिंक्ड लेंडिग रेट (RLLR) मध्ये 75 बेसिस पॉईंंट्स (75 bps) अर्थात 0.75 टक्क्यांची कपात केली आहे. या कपातीनंतर बँकेचा RLLR 8.05 टक्क्यांवरून कमी होत 7.30 टक्क्यांवर पोहोचला आहे. त्याचबरोबर बँकेने मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिग रेट (MCLR) मध्ये सुद्धा कपात केली आहे. कॅनरा बँकेने MCLR मध्ये 35 bps म्हणजे 0.35 टक्क्यांची कपात केली आहे. (हे वाचा- जाणून घ्या लॉकडाऊन संपल्यावर कधी सुरू होणार विमानसेवा, GoAirने दिली ही माहिती ) नवीन दर आजपासूनच म्हणजचे 7 एप्रिलपासून लागू होणार आहेत. सिंडिकेट बँकेचे विलीनीकरण कॅनरा बँकेबरोबर झाले आहे. किती कपात झाली? सार्वजनिक क्षेत्रातील बँकेने एका वर्षाच्या कालावधीसाठी घेण्यात आलेल्या कर्जासाठी व्याजामध्ये0.35 टक्के, 6 महिन्यांच्या कालावधीसाछी 0.30 टक्के, 3 महिन्याच्या कालावधीसाठी 0.2 टक्के तर एक महिना तसच एका दिवसाच्या कर्जासाठी व्याजामध्ये 0.15 टक्क्यांची कपात केली आहे. अहवालानुसार आरएलएलआर 0.75 टक्के कमी करत 8.05 टक्क्यांवरून 7.30 टक्के करण्यात आला आहे. या बँकांच्या व्याजदरात कपात आरबीआयकडून रेपो रेटमध्ये कपात केल्यानंतर एसबीआय (SBI) ने सुद्धा व्याजदर घटवले होते. त्यानंतर बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, पीएनबी, यूनियन बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्रने सुद्धा व्याजदरात कपात केली होती. (हे वाचा- सरकारच्या ‘या’ योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळाली 62 हजार कोटींची मदत ) या सर्व बँकांनी रेपो लिंक्ड लेंडिंग रेटमध्ये (BRLLR) 75 बेसिस पॉईंट्स (75 bps) म्हणजेच 0.75 टक्क्यांची कपात केली आहे. आता कॅनरा बँकेने देखील व्याजदरात कपात केल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.