JOIN US
मराठी बातम्या / मनी / उद्यापासून पाच दिवस स्वस्तात करा सोनं खरेदी, असा घ्या फायदा

उद्यापासून पाच दिवस स्वस्तात करा सोनं खरेदी, असा घ्या फायदा

केंद्र सरकार 12 जुलैपासून सॉवरेन गोल्ड बॉन्ड स्कीम 2021-22 च्या चौथ्या सीरिजच्या विक्रीची (Sovereign Gold Bond Scheme 2021-22 – Series IV) सुरुवात करणार आहे. ही विक्री 16 जुलैपर्यंत चालेल.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 11 जुलै: सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. उद्यापासून तुम्ही स्वस्तात सोनं खरेदी (Gold Price) करू शकता. सोन्यात गुंतवणूक (Gold investment) करण्याचा विचार असेल, तर या संधीचा फायदा घेऊ शकता. सोमवारपासून यासाठी चांगली संधी आहे. केंद्र सरकार 12 जुलैपासून सॉवरेन गोल्ड बॉन्ड स्कीम 2021-22 च्या चौथ्या सीरिजच्या विक्रीची  (Sovereign Gold Bond Scheme 2021-22 – Series IV) सुरुवात करणार आहे. ही विक्री 16 जुलैपर्यंत चालेल. रिझर्व्ह बँकेनुसार (RBI), या सीरिजमध्ये प्रति ग्रॅम गोल्डची किंमत 4807 रुपये ठेवण्यात आली आहे. Sovereign Gold Bond आरबीआय सरकारकडून जारी करतं. प्रति ग्रॅम 50 रुपयांची सूट - सॉवरेन गोल्ड बॉन्ड 2021-22 ची चौथी सीरिज सोमवारपासून पाच दिवसांसाठी सब्सक्रिप्शनसाठी ओपन होईल. RBI नुसार, बॉन्डसाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करत असाल, तर तुम्हाला प्रति ग्रॅम 50 रुपये सूट मिळेल. म्हणजेच अशा गुंतवणुकदारांसाठी 1 ग्रॅम गोल्ड बॉन्डची किंमत 4757 रुपये होईल. कुठे खरेदी करता येईल बॉन्ड? गोल्ड बाँडची विक्री बँक, स्टॉक होल्डिंग कॉरर्पोरेशन ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस आणि मान्यता प्राप्त शेअर बाजार NSE आणि BSE द्वारे केली जाईल. Sovereign Gold Bond साठी अर्ज करताना पॅन कार्ड आवश्यक आहे. स्मॉल फायनान्स बँक आणि पेमेंट बँकमध्ये याची विक्री होत नाही. या योजनेंतर्गत वैयक्तिक गुंतवणूकदार आणि हिंदू अविभाजित कुटुंब एका आर्थिक वर्षात कमीत कमी एक ग्रॅम आणि अधिकाधिक चार किलोग्रॅम गोल्डसाठी गुंतवणूक करू शकतात. ट्रस्टसारख्या इतर संस्था वर्षाला 20 किलोग्रॅम सोन्यात गुंतवणूक करू शकतात.

(वाचा -  जुनी नाणी आणि नोटा आहेत का? मग तुम्ही एका रात्रीत होऊ शकता श्रीमंत; कसं ते वाचा )

सॉव्हरेन गोल्ड बॉन्ड म्हणजे काय? सॉव्हरेन गोल्ड बॉन्ड एक सरकारी बॉन्ड असतो. ज्याला डिमॅट स्वरुपात परिवर्तित करता येतं. याचं मुल्य रुपये किंवा डॉलरमध्ये नसतं, तर सोन्याच्या वजनात असतं. जर बॉन्ड पाच ग्रॅम सोन्याचा आहे, तर पाच ग्रॅम सोन्याची जितकी किंमत असेल तेवढी किंमत या बॉन्डची असेल. सरकारकडून आरबीआयच्या माध्यमातून हे सॉव्हरेन गोल्ड बॉन्ड जारी केले जातात. सरकारने सॉव्हरेन गोल्ड बॉन्डची सुरुवात नोव्हेंबर 2015 मध्ये केली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या