JOIN US
मराठी बातम्या / मनी / नोकरी करतानाच सुरू करा हा व्यवसाय, 1 लाखापर्यंत मिळेल नफा; किती करावी लागेल गुंतवणूक?

नोकरी करतानाच सुरू करा हा व्यवसाय, 1 लाखापर्यंत मिळेल नफा; किती करावी लागेल गुंतवणूक?

तुम्ही स्वत: चा व्यवसाय सुरू करण्याच्या (Start your own Business) तयारीत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. नोकरी करता-करताही तुम्हाला हा व्यवसाय करता येऊ शकतो.

जाहिरात

Business Idea

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 16 ऑक्टोबर: तुम्ही स्वत: चा व्यवसाय सुरू करण्याच्या (Start your own Business) तयारीत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. नोकरी करता-करताही तुम्हाला हा व्यवसाय करता येऊ शकतो. कोविडमुळे (Corona pandemic) अनेकांच्या नोकऱ्या गेल्या त्यामुळे अनेकांनी आता व्यवसाय करायचं निश्चित केलं आहे. अशा वेळी योग्य मार्गदर्शन मिळणं गरजेचं आहे. त्यामुळेच आम्ही तुम्हाला या व्यवसायाबद्दल माहिती देत आहोत. हा व्यवसाय असा आहे की तो करण्यासाठी तुमच्याकडे 1 लाख रुपयांचं भांडवल असेल तरीही पुरेसं आहे कारण मोदी सरकारच्या मुद्रा कर्ज (Mudra scheme Benefits) योजनेअंतर्गत या व्यवसायासाठी तुम्हाला 75 ते 80 टक्के व्यवसाय कर्ज मिळणार आहे. हा व्यवसाय आहे लाकडी फर्निचर तयार करण्याचा (Wooden Furniture Business). सध्या घरोघरी लाकडी फर्निचर दिसतं. अगदी खुर्ची-टेबलपासून ते कपाटं आणि सोफ्यापर्यंत लाकडी वस्तू वापरायला लोक प्राधान्य देतात. या व्यवसायात मोठा नफा (Profitable business Ideas) कमवता येतो. या लाकडी फर्निचरच्या व्यवसायासाठी तुम्ही प्रोजेक्ट रिपोर्ट सादर केलात की बँक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या वतीने सुरू केलेल्या मुद्रा योजनेअंतर्गत कर्जही देते. वाचा- Petrol-Diesel Price Today: इंधन दरवाढ सुरुच, आज पुन्हा वाढले पेट्रोल-डिझेल भाव इतकी करा गुंतवणूक लाकडी फर्निचरचा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुमच्याकडे साधारणपणे 1.85 लाख रुपयांचं भांडवल असायला हवं. तुम्ही व्यवसाय कसा सुरू करणार, त्यात तुमचं भांडवल किती असेल, खेळतं भांडवल किती लागेल, कर्ज किती रुपये लागले, तुम्ही वस्तू कशा आणि कुठे विकणार त्यातून नफा किती रुपये होईल आणि त्यातून तुम्ही कर्ज कसं फेडाल याची माहिती तुम्हाला प्रोजेक्ट रिपोर्टमधून द्यावी लागेल. किती कर्ज मिळेल? तुम्ही बँकेत सादर केलेला प्रोजेक्ट रिपोर्ट पाहून बँक त्याची व्यवहार्यता तपासेल. त्याचबरोबर तुम्हाला काही प्रश्न विचारले जातील. त्यांची उत्तर तुम्ही योग्य पद्धतीने दिली आणि प्रोजेक्ट व्यवहार्य वाटला तर बँक तुम्हाला मुद्रा योजनेअंतर्गत कंपोझिट कर्जाअंतर्गत 7.48 लाख रुपयांचं कर्ज मंजूर करेल. यात पक्कं भांडवल म्हणून 3.65 लाख रुपये आणि तीन महिन्यांसाठी खेळतं भांडवल म्हणून 5.70 लाख रुपये देईल. वाचा- खूशखबर! LPG गॅस सिलेंडरच्या बुकिंगवर निश्चित Cashback, वाचा कसं कराल बुकिंग? किती रुपयांचा नफा कमवाल? तुम्ही हा व्यवसाय सुरू केलात आणि लाकडी फर्निचरची विक्री सुरू केल्यावर जम बसायला थोडा वेळ लागेल. तुम्हाला विक्रीसाठी प्रयत्न करावे लागतील पण एकदा का तुमचा जम बसला की तुम्हाला सगळा खर्च वजा जाता 60 हजार ते 1 लाख रुपयांचा नफा होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही व्यवसाय सुरू करण्याच्या विचारात असाल तर तातडीने या व्यवसायाचा विचार पक्का करू शकता. तुम्हाला नोकरीसोबत हा व्यवसाय करता येईल त्यामुळे कमाई वाढेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या