JOIN US
मराठी बातम्या / मनी / Business Idea: 'या' पदार्थाशिवाय पूर्ण होत नाही शहरी लोकांचा ब्रेकफास्ट, बिझनेस करुन होता येईल मालामाल!

Business Idea: 'या' पदार्थाशिवाय पूर्ण होत नाही शहरी लोकांचा ब्रेकफास्ट, बिझनेस करुन होता येईल मालामाल!

Business Idea: सध्याच्या काळात ब्रेडची मागणी मोठ्या शहरांपासून तर गावांपर्यंत सगळीकडेच वाढली आहे. मोठ्या शहरांमध्ये जास्तीत जास्त लोक सकाळच्या नाष्त्यामध्ये ब्रेडचा वापर करतात. तुम्ही याचा बिझनेस सुरु करुन मलामाल होऊ शकता.

जाहिरात

बिझनेस आयडिया

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 22 जुलै : आजकाल जास्तीत जास्त शहरी लोकांच्या ब्रेकफास्टमध्ये ब्रेड मुख्यतः वापरलं जातं. यापासून अनेक पदार्थ देखील तयार केले जातात. ब्रेड सहज सर्वाधिक ठिकाणी सहज उपलब्ध होत असल्यामुळे याची लोकप्रियता देखील जास्त आहे. अशा वेळी तुम्ही एखादा नवीन बिझनेस सुरु करण्याचा प्लान करत असाल तर तुम्ही ब्रेड बनवण्याचा बिझनेस सुरु करु शकता. चांगल्या मार्केटिंगद्वारे, तुम्ही तुमचा ब्रेडचा व्यवसाय खूप वेगाने वाढवू शकता आणि प्रचंड कमाई करू शकता. यासाठी, आपण पहिले आपल्या लोकल मार्केटमध्ये याची माहितीत डिमांड आणि सप्लाय किती आहे हे समजून घ्या. ब्रेडचा व्यवसाय कसा सुरु करायचा आणि याला किती गुंतवणूक करावी लागेल याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

बिझनेसची सुरुवात कशी करावी? ब्रेड तयार करण्याचा बिझनेस सुरु करण्यासाठी तुम्हाला ब्रेड बनवण्याची फॅक्ट्री सुरु करावी लागेल. यासाठी तुम्हाला बिल्डिंग, मशीन, जमीन, वीज-पाण्याची सुविधा आणि कर्मचाऱ्यांची गरज लागेल. तुम्ही छोट्या स्तरावरुन बिझनेस सुरु करणार असाल तर तुम्हाला फॅक्ट्री लावण्यासाठी जवळपास 1000 वर्गफुटाची जागा लागेल. यासोबतच ब्रेड एक खाद्यपदार्थ असल्यामुळे या बिझनेससाठी तुम्हाला एक रजिस्ट्रेशन करावं लागेल. यासोबतच तुम्हाला एफएसएसएआयकडूनही लायसन्स घ्यावं लागेल. Business Idea: फक्त 5 हजारात सुरु करा हा सुपरहिट बिझनेस, होईल भरपूर कमाई! किती खर्च येईल? तुम्ही उत्तम प्लानिंगसह हा बिझनेस सुरू केलात तर तुम्हाला त्यात जास्त पैसे गुंतवण्याची गरज नाही. सुरुवातीला, तुम्ही आवश्यक संसाधनांसह हा व्यवसाय सुरू करू शकता आणि त्यानंतर तुम्ही कमाईसह तो मोठा करू शकता. तुम्ही छोट्या स्तरावर ब्रेड बनवण्याचा व्यवसाय सुरू केला तर तुम्हाला मशिनरी आणि इतर वस्तू खरेदी करण्यासाठी 5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करावी लागेल. तुमच्याकडे व्यवसाय सुरू करण्यासाठी पुरेसे पैसे नसल्यास, तुम्ही प्रधानमंत्री मुद्रा योजनेचीही मदत घेऊ शकता. Business Idea: एक अंड 50 रुपयांचं, सामान्य चिकनपेक्षा चारपट महाग मिळतं ‘कडकनाथ’; पाहा कसं करावं पालन कमाई किती असेल? आजकाल मोठ्या शहरांपासून लहान शहरांपर्यंत सर्वत्र ब्रेडची मागणी कायम आहे. अशा स्थितीत तुमच्या व्यवसायात सक्सेस होण्याची पूर्ण शक्यता आहे. जर आपण ब्रेडच्या व्यवसायातून कमाईबद्दल बोललो, तर सामान्य ब्रेडच्या पॅकेटची किंमत 40 ते 60 रुपये आहे. त्याच वेळी, ते बनवण्याचा खर्च देखील खूप कमी आहे, म्हणजेच, जर तुम्ही त्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन केले तर तुम्ही दरमहा लाखो रुपये कमवू शकता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या