JOIN US
मराठी बातम्या / मनी / Business Idea : लेमनग्रासच्या मागणीत मोठ्या प्रमाणात होतेय वाढ! शेती करुन करा बंपर कमाई

Business Idea : लेमनग्रासच्या मागणीत मोठ्या प्रमाणात होतेय वाढ! शेती करुन करा बंपर कमाई

Business Idea : मॉडर्न लाइफस्टाइलमध्ये लेमनग्रासची मागणी खूप जास्त आहे. कारण याच्या सेवनाचे अनेक फायदे आहे. यामुळे याची शेती तुम्हाला मालामाल करण्यास मदत करु शकते.

जाहिरात

लेमन ग्रास

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 11 जुलै : तुम्ही शेती करत असाल आणि जास्त कमाईसाठी काही तरी नवीन करायचा विचार करताय तर एक जबरदस्त आयडिया आम्ही घेऊन आलोआहोत. खरंतर मार्केटमध्ये अनेक गोष्टींची जबरदस्त डिमांड असते. मात्र त्याचं उत्पादन हे कमी असते. असच एक पीक म्हणजे लेमनग्रास. तुम्हाला शेतात नवीन काही तरी सुरु करायची असेल तर एक बेस्ट ऑप्शन ठरु शकतो. कारण याची मागणी सध्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

मॉडर्न लाइफस्टाइलमुळे लेमनग्रासची मागणी मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. याचे सेवन करण्याचे अनेक फायदे आहेत, त्यामुळेच लेमनग्रासही जास्त भावाने विकला जातो. तुम्ही त्याची लागवड कशी सुरू करू शकता हे आपण जाणून घेऊया. Business Idea: फक्त 5 हजारात सुरु करा हा सुपरहिट बिझनेस, होईल भरपूर कमाई! शेती कशी सुरू करावी? तुम्हाला लेमनग्रास लागवड सुरू करायची असेल तर सर्वप्रथम तुम्हाला पेरणीची तयारी करावी लागेल. यानंतर या गवताच्या बियांची लागवड करावी लागेल. त्याच्या चांगल्या उत्पादनासाठी, त्याला 15 दिवसांच्या आत पाणी दिले जाते. गवतामध्ये 30 दिवस पाणी टाकले जाते, त्यामुळे त्याचे उत्पादन चांगले होते. यानंतर आपण ते बऱ्याच वेळा कापू शकतो. एका पिकासह, आपण वर्षातून तीन ते चार वेळा कापणी करून गवत घेऊ शकतो. Business Idea: एक अंड 50 रुपयांचं, सामान्य चिकनपेक्षा चारपट महाग मिळतं ‘कडकनाथ’; पाहा कसं करावं पालन लेमनग्रासचा फायदा काय? लेमनग्रासमध्ये अनेक प्रकारचे गुण असतात. यामुळे याची डिमांड आणि किंमत दोन्हीही जास्त असते. या गवताने एक किंवा दोन प्रकारे नाही तर अनेक प्रकारे बिझनेस केला जाऊ शकतो. तुम्ही हे गवथ थेट बाजारात विकूनही पैसा कमावू शकता. तसंच याचा उपयोग वाळवून चहापत्तीमध्ये देखील केला जाऊ शकतो. यासोबतच लेमनग्रासचं तेल तयार करुनही विक्री करता येऊ शकते. कमाई किती असेल? लेमनग्रासची लागवड केल्यास वर्षभरात लाखो रुपयांपर्यंत उत्पन्न मिळू शकते. वर्षातून 3 वेळा लागवड करता येते. बाजारात लेमन ग्रास तेलाची किंमत 1500 रुपये प्रति लीटरपर्यंत आहे. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही या गवतापासून चहा बनवून विकू शकता. अशा प्रकारे तुम्ही दरवर्षी लाखो रुपये कमवू शकता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या