प्रातिनिधिक फोटो
मुंबई, 24 मार्च : बजेट एअरलाइन्स इंडिगोने (Indigo) आपल्या कर्मचार्यांच्या पगारामध्ये कपात न करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. इंडिगोच्या फ्लाइट्स रद्द असल्याने काही कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्यात आली आहे, या काळात पगार कपात होणार नसल्याने कर्मचाऱ्यांसाठी हा मोठा दिलासा आहे. कोरोनाव्हायरसचा (Coronavirus) वाढता धोका लक्षात घेता सरकारने मंगळवारी मध्यरात्री ते 31 मार्च दरम्यान देशांतर्गत उड्डाणे बंद केली आहेत. कर्मचार्यांना पाठवलेल्या ईमेलमध्ये इंडिगोचे मुख्य कार्यकारी अधिकारी रंजय दत्ता म्हणाले की, कंपनीकडे एप्रिलसाठी आधीच अॅडव्हान्स बुकिंग आहे. ते म्हणाले, ज्या या कर्मचार्यांना या कालावधीत सुट्टी दिली आहे, आम्ही त्यांच्या पगारामध्ये कपात करणार नाही. (हे वाचा- बचत खात्यासंदर्भातील हा महत्त्वाचा नियम बदलला, आता राहा टेन्शन फ्री ) दत्ता म्हणाले की, मागील काही दिवस विमान कंपनीसाठी खूप आव्हानात्मक होते आणि निश्चितच आपले उत्पन्न येत्या काही आठवड्यांत आमच्या खर्चापेक्षा कमी होणार आहे. अशा परिस्थितीत आमची पैसे वाचवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. ते म्हणाले की, या तात्पुरत्या निलंबनाच्या कालावधीत कंपनी त्याची आतापर्यंतची बचत कर्मचार्यांचे वेतन देण्यासाठी वापरणार आहे. फ्लाइट रद्द केल्यास कोणतही शुल्क नाही इंडिगोने शनिवारी घोषणा केली की ते 31 मार्चपर्यंत आपल्या ग्राहकांकडून उड्डाण रद्द आणि किंवा रिशेड्यूल करण्यासाठी कोणतही शुल्क आकारणार नाहीत. इंडिगोने कोरोना व्हायरसचं वैश्विक संकट लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे. (हे वाचा- आता दुसऱ्या बँकेच्या ATMमधून पैसे काढण्यासाठी नाही द्यावा लागणार कोणताही चार्ज ) काही दिवसांपूर्वी इंडिगोचे सीईओ रंजय दत्ता यांनी घोषणा केली होती की, इंडिगोच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये कपात करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे दत्ता यांच्या स्वत:च्या पगारातही 25 टक्के कपात केली असल्याचं सांगितलं होतं. IndiGo Airline चं कोव्हिड-19 (COVID-19) च्या संक्रमणामुळे न भरून निघणारे नुकसान झाले आहे. पण त्यांनी आता ही घोषणा केल्यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.