अर्थसंकल्पात 8वा वेतन आयोग येणार?
नवी दिल्ली, 28 जानेवारी : केंद्रीय अर्थसंकल्प (Budget 2023) सादर होण्यासाठी फक्त 4 दिवस उरले आहेत. अर्थसंकल्पाकडून सर्वच क्षेत्रातील लोकांना खूप अपेक्षा आहेत. त्याचबरोबर सरकारी कर्मचाऱ्यांनाही या अर्थसंकल्पाकडून मोठ्या आशा आहेत. 8 वा वेतन आयोग लागू करण्याची मागणी अनेक दिवसांपासून सरकारी कर्मचारी करत आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करताना 8 वा वेतन आयोग लागू करण्याची घोषणा करू शकतात, असे मानले जात आहे. असे झाल्यास सरकारी कर्मचाऱ्यांच्या आनंदाला पारावार उरणार नाही. सध्या देशात सातवा वेतन आयोग सुरू आहे. सरकारने 8वा वेतन आयोग जाहीर केल्यास सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे. तसे झाल्यास खालच्या स्तरापासून वरच्या स्तरापर्यंतच्या सरकारी अधिकाऱ्यांचे पगार वाढतील. वेतन आयोग दर 10 वर्षांनी येतो कर्मचाऱ्यांना वेतन आयोग दर 10 वर्षांनी लागू केला जातो. हा प्रकार आतापर्यंत 5व्या, 6व्या आणि 7व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीत दिसून आला आहे. 2023 मध्ये 8 वा वेतन आयोग स्थापन केला जाईल आणि त्याच्या शिफारशी 2026 मध्ये लागू केल्या जातील असा अंदाज कर्मचाऱ्यांनी पूर्वी व्यक्त केला होता. अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारीपासून सुरू होणार विशेष म्हणजे, यावेळी संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारी 2023 पासून सुरू होईल, ज्या दिवशी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त बैठकीला संबोधित करतील. अधिवेशनाच्या 27 बैठका होणार असून ते 6 एप्रिलपर्यंत चालणार आहे. अधिवेशनाचा पहिला टप्पा 31 जानेवारी ते 14 फेब्रुवारीपर्यंत असेल. सुमारे महिनाभराच्या विश्रांतीनंतर अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा 12 मार्चपासून सुरू होणार असून ते 6 एप्रिलपर्यंत चालणार आहे. वाचा - ‘या’ 5 जणांवर आहे बजेटची जबाबदारी, निर्मला सीतारामण यांचे 5 चाणक्य कोण?
आगामी अर्थसंकल्प मागील दोन वेळेप्रमाणे पेपरलेस पद्धतीने सादर केला जाणार आहे. मंत्र्यांच्या भाषणानंतर, त्यांनी केलेल्या सर्व घोषणा अॅपवर अपलोड केल्या जातील. जिथे माहितीचे विविध विभागांतर्गत वर्गीकरण केले गेले आहे, ज्यामुळे आवश्यक तपशीलांमध्ये प्रवेश करणे सोपे होईल. खरं तर, सर्व बजेट दस्तऐवज - एकूण चौदा - अॅपवर उपलब्ध केले जातात.
बजेट तुम्हाला ऑनलाइन पाहायचे असल्यास तुम्ही पीआयबी आणि संसद टीव्हीच्या अधिकृत यूट्यूब चॅनलचा वापर करु शकता. दूरदर्शन आणि संसद टीव्हीवर देखील तुम्ही ते लाईव्ह पाहू शकता. यासोबतच News Lokmat चॅनलवर देखील तुम्हाला सर्व अपडेट्स मिळतील.