JOIN US
मराठी बातम्या / मनी / Budget 2022: पगारधारकांना अर्थसंकल्पात मिळणार गिफ्ट? अशा आहेत या वर्गाच्या अपेक्षा

Budget 2022: पगारधारकांना अर्थसंकल्पात मिळणार गिफ्ट? अशा आहेत या वर्गाच्या अपेक्षा

देशातल्या पगारदार वर्गाला (Salaried class) यंदाच्या अर्थसंकल्पाकडून विशेष अपेक्षा आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) पगारदार वर्गाला अर्थसंकल्पाच्या माध्यमातून कशा प्रकारे दिलासा देतात, याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलं आहे

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 19 जानेवारी: लवकरच केंद्रीय अर्थसंकल्प (Union budget) सादर होणार आहे. कोरोनामुळे (Budget during Corona Pandemic) निर्माण झालेल्या स्थितीच्या पार्श्वभूमीवर हा अर्थसंकल्प वैशिष्ट्यपूर्ण असेल, अशी चर्चा आहे. देशातल्या पगारदार वर्गाला (Salaried class) यंदाच्या अर्थसंकल्पाकडून विशेष अपेक्षा आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) पगारदार वर्गाला अर्थसंकल्पाच्या माध्यमातून कशा प्रकारे दिलासा देतात, याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलं आहे. पगारदार वर्गाच्या दृष्टीने आयकर स्लॅब (Income Tax Slab) आणि अधिभारात कपात (Reduction in surcharge) हे मुद्दे विशेष महत्त्वाचे आहे. याबाबत अर्थसंकल्पात काय तरतूद असू शकते, याची उत्सुकता या वर्गाला आहे. 1 फेब्रुवारी 2022 रोजी सादर होणार असलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पाकडून पगारदार करदात्यांना अनेक अपेक्षा आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर या अर्थसंकल्पात करदात्यांना दिलासादायक ठरतील अशा काही घोषणा होण्याची शक्यता आहे. 2022-23 साठीच्या केंद्रीय अर्थसंकल्पात आयकर स्लॅबमध्ये बदल आणि अधिभारात कपात होण्याची आशा पगारदार वर्गातल्या करदात्यांना आहे. 31 जानेवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होत असून, 1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करणार आहेत. हे वाचा- Budget 2022 : देशाच्या अर्थसंकल्पात नेमकं काय असतं? जाणून घ्या सविस्तर 80 सी (80C) अंतर्गत गुंतवणुकीवर जास्त करसवलत पगारदार वर्गाबद्दल बोलायचं झालं तर, या अर्थसंकल्पात आयकर कायद्याच्या कलम 80 सी अंतर्गत गुंतवणुकीवर अधिक करसवलत जाहीर केली जाऊ शकते, अशी आशा त्यांना आहे. याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून मागणी होत असली, तरी या वेळच्या अर्थसंकल्पात याबाबत काही मोठी घोषणा होते का हे पाहावं लागेल. नोकरदारांसाठी कलम 80 सी हा कर (Tax) वाचवण्यासाठीचा सर्वांत महत्त्वाचा मार्ग आहे. या कलमांतर्गत सवलतीची मर्यादा वाढवली गेली तर त्यामुळे अधिकाधिक नागरिकांना दिलासा मिळू शकतो. सध्या कलम 80सी अंतर्गत वार्षिक 1.5 लाख रुपयांची सवलत मिळते. याशिवाय, अर्थसंकल्पामध्ये गृहकर्जाच्या व्याजावरच्या (Home Loan Interest) कर वजावटीची मर्यादा 2 लाख रुपयांवरून 5 लाख रुपयांपर्यंत वाढवावी, तसंच प्रिन्सिपल अमाउंटवर 80 सी अंतर्गत वेगळी 1.50 लाख रुपयांपर्यंतची सवलत असावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. हे वाचा- Network18 ची रेकॉर्डब्रेक कामगिरी, गेल्या तिमाहीत मोडले कमाईचे सर्व विक्रम आयकर स्लॅबमध्ये बदल अपेक्षित? गेल्या अनेक वर्षांपासून आयकर स्लॅबच्या मर्यादेत वाढ करण्यात आली नसल्याने, त्यात बदल करावा अशी मागणी पगारदार वर्गानं अर्थमंत्र्यांकडे केली आहे. येत्या अर्थसंकल्पात प्राप्तिकर दरात कोणताही बदल जाहीर होण्याची शक्यता नाही. सरकार येत्या अर्थसंकल्पातही नवी आणि जुनी करप्रणाली लागू ठेवू शकतं. एकूणच हा अर्थसंकल्प विशेष दिलासादायी असावा, अशी आशा पगारदार वर्गाला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या