JOIN US
मराठी बातम्या / मनी / Jio ची धमाकेदार ऑफर, एकदाच रिचार्ज करा आणि वर्षभर मिळवा अनलिमिटेड सुविधा

Jio ची धमाकेदार ऑफर, एकदाच रिचार्ज करा आणि वर्षभर मिळवा अनलिमिटेड सुविधा

रिलायन्स जिओनं खास प्लॅन (Reliance Jio Special Plan) लॉन्च केला आहे. कंपनीनं प्रीपेड यूजर्सासाठी हा खास प्लॅन लॉन्च केला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 06 मार्च : कोरोना (Coronavirus) काळात अनेकजण अजूनही घरुनच आपलं काम (work from home) करत आहेत. अशांसाठी रिलायन्स जिओनं खास प्लॅन (Reliance Jio Special Plan) लॉन्च केला आहे. कंपनीनं प्रीपेड यूजर्सासाठी हा खास प्लॅन लॉन्च केला आहे. विशेष बाब म्हणजे कंपनीच्या प्लॅन लिस्टमध्ये बजेटच्या किमतीतही फ्री कॉलिंगसारख्या सुविधा दिल्या जात आहेत. इतकंच नाही तर अनेक प्लॅन जास्त व्हॅलिडीटी,जास्त डाटा आणि इतर फायद्यांसोबत दिले जात आहेत. आज आम्ही रिलायन्स जिओच्या अशा प्लॅनबद्दल माहिती देत आहोत, ज्यामुळे तुम्ही एकदा रिचार्ज करून वर्षभरासाठी याचा वापर करू शकता. कंपनीनं आता 336 दिवसांची मुदत असणारा प्लॅन ऑफर केला आहे. यामुळे ग्राहकांना भरपूर फायदा मिळणार आहे. जिओच्या 1299 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनची मुदत 336 दिवस आहे. तुम्हालाही या ऑफरचा फायदा घ्यायचा असल्यास जिओच्या वेबसाईटवर ‘Other’ कॅटेगिरीमध्ये जाऊन तुम्ही तो घेऊ शकता. यामध्ये ग्राहकांना जवळपास 24 GB डाटाही ऑफर केला जातो. कंपनीकडून ऑफर केला जाणारा 24GB डाटा संपल्यानंतर याचं स्पीड कमी होऊन 64Kbps वर येतं. इतकंच नाही, तर याच वापरकर्त्यांना जिओ अॅप्सचं सबस्क्रीप्शनही मोफत (Complimentory Subscription) मिळतं. कॉलिंगसाठी यात जीओ टू जीओ आणि इतर कॉलसाठीही फ्रीमध्ये फायदा दिला जात आहे.याशिवाय यात 3600 SMSही फ्री मिळतात. या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड व्हॉईस कॉलची सुविधा दिली जाते. म्हणजेच यूजर हा प्लॅन घेऊन एकदा रिचार्ज करत वर्षभर फ्री कॉल आमि डाटाचा वापर करू शकतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या