JOIN US
मराठी बातम्या / मनी / Samsung चे 'हे' फोन आहेत बेस्ट! मिळताय जबरदस्त फिचर्स, खिशालाही बसणार नाही झळ

Samsung चे 'हे' फोन आहेत बेस्ट! मिळताय जबरदस्त फिचर्स, खिशालाही बसणार नाही झळ

Galaxy A34 5G आणि Galaxy A54 5G हे त्यांच्या श्रेणीतील असे फोन आहेत, ज्याची तुलना तुम्ही इतर कोणत्याही फोनशी करू शकत नाही.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 12 एप्रिल: Samsung चे अगदी अप्रतिम असे फोन मार्केटमध्ये आले आहेत. यामध्ये तुम्हाला जबरदस्त फिचर्स पाहायला मिळतील. एवढंच नाही तर तुमच्या खिशाला परवडतील असे हे फोन आहेत. त्यांची सुरुवातीची किंमत फक्त 27,999 रुपये आहे. यासोबतच तुम्हाला अनेक जबरदस्त ऑफरही मिळतील. Galaxy A34 5G आणि Galaxy A54 5G असे हे दोन फोन आहेत. दोन्ही फोनची डिझाइनही खूप सुंदर आहे. IP67 रेटिंग, Corning Gorilla Glass 5 सुरक्षा आणि फ्लॅगशिप ग्रेड रात्रीच्या वेळी फोटो आणि व्हिडिओ घेण्याची सुविधा देतात. या खास फीचर्सच्या मदतीने यूझर्सला एक शानदार अनुभव मिळेल. तो देखील अगदी कमी किंमतीत.

Samsung चे लेटेस्ट स्मार्टफोन Galaxy A34 5G आणि Galaxy A54 5G ने तुमचे आयुष्य पहिल्यापेक्षा इंट्रेस्टिंग होईल. यासोबतच किंमतही खिशाला परवडणार अशा आहेत. IP67-रेटिंगच्या कोणत्याही फोनमध्ये ही डिज़ाइन और फ़ीचर्स तुम्हाला मिळणार नाहीत. या फोनमध्ये तुम्हाला Corning Gorilla Glass 5 कची सुरक्षा फ्रंट आणि बॅक दोन्ही बाजूने मिळेल. यासोबतच रात्रीच्या वेळीही सहज फोटो काढता येतील. यात असे काही फिचर्स आहेत ज्यामुळे रात्रीच्या वेळीही फोटो चांगले येतील. या फोनची किंमत सुरु होतेय फक्त 27,999 रुपयांपासून. या किंमतीत असे फिचर्स तुम्हाला कोणत्याच मोबाईलमध्ये मिळणार नाहीत. Galaxy A34 5G आणि Galaxy A54 5G ची या सेगमेंटमध्ये कोणीही बरोबरी करु शकत नाही.

10 मिनिटांत मिळवा 10 लाखांचं लोन! बँकेतही जाण्याची गरज नाही फक्त व्हॉट्सअ‍ॅपवर लिहा ‘HI’

ट्रेंडी कलर्स तुमच्या स्टाइल सेगमेंटला हटके लूक देतील

Samsung Galaxy A34 5G आणि Galaxy A54 5G नवीन पिढीची (Gen Z) जॉइस आणि लाइफस्टाइल लक्षात घेऊन डिझाइन केलेले आहेत. दोन्ही फोनचे प्रिमियम, ट्रेंडी रंग तुमची स्टाइल हटके बनवतील. सर्वात ट्रेंडी कलर्सच्या फोनमुळे तुम्ही गर्दीतही उठून दिसाल. फोनची डिझाइनही दर्जेदार आहे. यामुळे तुम्ही फॅशनेबल दिसाल.

तरुण पिढी आपली जीवनशैली आणि आवडीनिवडी यांच्याशी तडजोड करू इच्छित नाही. स्मार्टफोनचा विचार केला तर तुम्हाला तुमच्या आवडीच्या रंगासह अनेक ऑप्शन या फोनमध्ये मिळत आहेत. Galaxy A54 5G तीन आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे: ऑसम लाइम, ऑसम व्हायोलेट आणि ऑसम ग्रेफाइट. हे तिन्ही रंग प्रीमियम ग्लास फिनिशसह उपलब्ध आहेत. Galaxy A34 5G हेझ टेक्सचरसह ऑसम लाइम, ऑसम ग्रेफाइट आणि ऑसम सिल्व्हर प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. Samsung Galaxy A34 5G आणि Galaxy A54 5G सह, तुम्ही गर्दीत वेगळे दिसाल. तुमची निवड आणि स्टाइल नक्कीच कौतुकास्पद आहे.

मजबूत, दीर्घकाळ टिकणारे आणि अॅक्शनयुक्त असे फोन!

स्लीक आणि स्टायलिश असण्याव्यतिरिक्त, Galaxy A34 5G आणि Galaxy A54 5G दीर्घकाळ टिकणारे फोन आहेत. आता तुम्हाला तुमचा फोन वापरताना धूळ आणि पाण्यापासून संरक्षण करण्याची काळजी करण्याची गरज नाही. दोन्ही स्मार्टफोन IP67 सर्टिफाइड आहेत. आता धूळ किंवा वाळू असेल किंवा चुकून मोबाईल पाण्यात पडला तरी काळजी करण्याची गरज नाही. Galaxy A34 5G आणि Galaxy A54 5G हे तुमच्या धाव-पळीच्या आयुष्यासाठी बेस्ट आहे.

फोनला आहे विशेष सुरक्षा, पडला तरी फुटणार नाही

आपल्या तरुण पिढीला वेगवान आयुष्य आवडतं. या प्रकारच्या धावपळीच्या जीवनात फोन पडून तुटण्याचा धोका असतो. Galaxy A34 5G आणि Galaxy A54 5G च्या कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 संरक्षणासह, तुम्हाला अजिबात काळजी करण्याची गरज नाही. चुकून काही वेळा फोन पडला तर तुटून नुकसान होण्याचे टेन्शन नाही!

नाइटोग्राफीसह रात्रीच्या वेळी देखील येथील स्पष्ट फोटोज

नाइटोग्राफी वैशिष्ट्य सॅमसंगचे सर्वात प्रगत नाईट मोड वैशिष्ट्य आहे. याच्या मदतीने तुम्ही कमी प्रकाशातही छान फोटो काढू शकता. सर्वप्रथम, हे फीचर गेल्या वर्षी फ्लॅगशिप सीरिज अंतर्गत लॉन्च करण्यात आले होते. गॅलेक्सी A34 5G आणि Galaxy A54 5G सह मिड-रेंज फोनमध्ये हे वैशिष्ट्य प्रथमच उपलब्ध आहे. लेट नाईट म्युझिक पार्टी असो किंवा लेट नाईट मस्ती असो, मित्रांसोबत नाईट आउट असो किंवा घरात मोठ्या आवाजात पार्टी होत असो. Galaxy A34 5G आणि Galaxy A54 5G सह तुम्हाला कशाचाही विचार करण्याची गरज नाही. तुमच्या सोशल मीडिया अपडेट्ससाठी कधीही, कुठेही फोटो आणि व्हिडिओ तुम्ही घेऊ शकता.

मिळतील हे जबरदस्त फिचर्स

सर्वात चांगली गोष्ट म्हणजे या दोन्ही फोनमध्ये अतिशय लोकप्रिय OIS तंत्रज्ञानाने सुसज्ज कोणतेही शेक कॅमेरे नाहीत. म्हणजेच, अंधार असो किंवा कमी प्रकाश, कॅमेरा पूर्णपणे स्थिर राहील आणि फोटो काढताना ते हलण्याची भीती राहणार नाही. Galaxy A54 5G मध्ये मागील बाजूस OIS सह 50-मेगापिक्सेलचा प्राथमिक सेन्सर आहे. तसेच, 12 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड आणि 5 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर आहे. Galaxy A34 5G मध्ये येत असताना, यात OIS सह 48-मेगापिक्सलचा सेन्सर सोबत 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड आणि 5-मेगापिक्सेलचा मॅक्रो कॅमेरा आहे. मागील पिढीच्या तुलनेत 1.5° रुंद OIS आणि 4 पट अधिक व्हिडिओ स्टेलायजेशन (VDIS) वापरले गेले आहेत. यामुळे, तुम्ही अधिक चांगल्या क्वॉलिटीमध्ये फोटो आणि व्हिडिओ बनवू शकता. आता तुम्हाला सोशल मीडिया अपलोडसाठी फोटो आणि व्हिडिओ ब्लर होण्याची काळजी करण्याची गरज नाही. या सर्वोत्कृष्ट स्मार्टफोन्सच्या सहाय्याने तुम्ही सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ अपलोड केल्यास त्यावर भरपूर कमेंट्स आणि लाईक्स येतील. उशीर न करता तुमच्या रोमांचकारी अनुभवासाठी सज्ज व्हा.

आता फसवणुकीपासून होईल सुटका! आधारशी लिंक नंबर आता घसबसल्या करता येईल व्हेरिफाय

संबंधित बातम्या

या स्मार्टफोन्ससोबत तुम्हाला शानदार अनुभव मिळेल

Samsung Galaxy A34 5G आणि Galaxy A54 5G सह, तुम्हाला सॉफ्टवेअरच्या बाबतीतही चांगला अनुभव मिळेल. या फोनमध्ये अनेक उत्कृष्ट फीचर्स आहेत, ज्यामुळे तुमच्या आयुष्यातील अनेक कामे सहज पूर्ण होतील. तसेच, हा फोन वापरताना तुम्हाला खूप मजेदार अनुभव मिळेल. बॅकग्राउंड आवाजामुळे व्हिडिओ किंवा ऑडिओ कॉन्फरन्समध्ये भाग घेणे तुमच्यासाठी अडचणीचे ठरले असल्यास, काळजी करू नका. व्हॉईस फोकसच्या सुविधेमुळे तुम्हाला अशा कॉन्फ्रेन्स आयोजित करणे खूप सोपे होईल. हे कॉल दरम्यान तुमचा आवाज अधिक स्पष्ट करेल. दुसरीकडे, तुमचा आवाज ऐकणारे तुमच्या स्पष्ट आवाजाची नक्कीच प्रशंसा करतील.

डेटा राहील सुरक्षित

Galaxy A34 5G आणि Galaxy A54 5G मध्ये Samsung Knox सुरक्षा फीचर वापरण्यात आले आहे. यासह, तुमचा डेटा पूर्णपणे सुरक्षित असेल आणि तुम्हाला फोनमध्ये असलेल्या माहितीबद्दल अजिबात काळजी करण्याची गरज नाही. हे सुरक्षा फिचर मालवेअर आणि सायबर हल्ल्यांपासून संपूर्ण संरक्षण देते. तुमचा डेटा संरक्षित करण्यासाठी तुम्ही पासकोड किंवा बायोमेट्रिक लॉक देखील वापरू शकता. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे knox सह तुम्हाला डबल लेयर संरक्षण मिळेल. हे तुमच्या फोनचे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर दोन्ही संरक्षित करण्यासाठी आहे. आतापर्यंत तुमची कागदपत्रे एकाच ठिकाणी सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्हाला खूप काळजी करावी लागली असेल. विशेषतः रस्त्यावरून चालताना किंवा प्रवास करताना इ. या समस्येवर सॅमसंग वॉलेट हा एक सोपा आणि सुरक्षित उपाय आहे. हे कार्ड टॅप आणि पेसह UPI ची सुविधा देखील प्रदान करतात. तसेच. येथून तुम्ही सहज आणि त्वरीत पेमेंट करू शकता. याशिवाय, यूझर्स त्यांची सर्व ओळखपत्रे आणि महत्त्वाची कागदपत्रे एकाच सुरक्षित ठिकाणी ठेवू शकतात. तुम्हाला हवे तेव्हा किंवा तुमच्या सोयीनुसार तुम्ही ते वापरू शकता. शेवटी, तुमचा स्मार्टफोन लेटेस्ट तंत्रज्ञान आणि वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहे. तसेच, तुम्हाला सर्वोत्तम आणि लेटेस्ट  सुरक्षा अपडेट मिळतील कारण Galaxy A34 5G आणि A54 5G ला 4 महत्त्वपूर्ण OS अपडेट मिळतील. याशिवाय सॅमसंग तुम्हाला स वर्षांसाठी सर्व सिक्युरिटी अपडेट्स देण्याचे वचन देतो. Galaxy A34 5G आणि Galaxy A54 5G हे त्यांच्या श्रेणीतील असे फोन आहेत, ज्याची तुलना तुम्ही इतर कोणत्याही फोनशी करू शकत नाही. या किमतीत इतर कोणत्याही स्मार्टफोनमध्ये इतके फिचर्स आणि सुविधा मिळणार नाहीत. आता उशीर का करताय? Samsung Galaxy A34 5G आणि Galaxy A54 5G आता बुक करा! Galaxy A34 5G आणि Galaxy A54 5G ची सुरुवातीची किंमत फक्त रु 27,999 आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या